Homeताज्या बातम्यापुण्यातील एका रिसॉर्टमध्ये अभिनेत्रीवर झाला बलात्कार आरोपीवर गुन्हा दाखल

पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये अभिनेत्रीवर झाला बलात्कार आरोपीवर गुन्हा दाखल

पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये अभिनेत्रीवर झाला बलात्कार आरोपीवर गुन्हा दाखल…

पुणे : रिसॉर्टमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विराज पाटील नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार झाल्यानंतर अभिनेत्रीच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून तिला ठार मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली आहे.

या प्रकरणी ३५ वर्षीय विराज पाटीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी या अभिनेत्रीने तक्रार दाखल केली होती. अभिनेत्री आणि विराज यांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. विराजने पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करेन असं म्हणत अभिनेत्रीवर पुण्यातल्या मुळशी भागातील रिसॉर्टमध्ये वेळोवेळी बलात्कार केला. लग्नाचं आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, असं अभिनेत्रीने तक्रारीत म्हटलंय.

२०२३ पासून प्रकरण सुरू

२७ ऑगस्ट २०२३ पासून २० जानेवारी २०२४ या कालावधीत विमाननगर आणि मुळशी भागातील रिसॉर्टमध्ये सातत्याने बलात्कार झाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. त्यानंतर पीडिताने फोन केल्यानंतर आरोपीने ते फोनसुद्धा उचलणं बंद केलं होतं. माझ्या घरच्यांना का टाळत आहेस? फोन का उचलत नाही, असा प्रश्न विराजला महिलेनं विचारल्यावर त्याने शिवीगाळ केली. तसंच त्याच्याकडे असलेलं पिस्तूल तरुणीच्या डोक्यावर ठेवून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही आणि तू जर पोलिसांकडे गेली तर तुला मी दाखवतो कोण आहे, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

विराज पाटील हा राजकीय पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून पीडित महिला अभिनेत्री आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमीचा फायदा विराज पाटील घेत होता. त्यातूनच त्यांची पुढे ओळख वाढत गेली आणि पुढे हा सगळा प्रकार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!