Homeताज्या बातम्याअपहरण करून खून झालेल्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार पुण्यातील घटना.

अपहरण करून खून झालेल्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार पुण्यातील घटना.

अपहरण करून खून झालेल्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार पुण्यातील घटना…

पिंपरी : वाकड येथील अपहरण करून खून झालेल्या आठवर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. उसाचा रस पाजून मुलाला आमिष दाखवले. त्यानंतर घराजवळ खेळत असताना त्याचे अपहरण केले.

त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. याबाबत चिमुकला कोणाला सांगू शकतो, या भीतीने मारहाण करून गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. रविवारी (दि. २५) ही घटना उघडकीस आली.

पवन जोगेश्वरप्रसाद पांडे (वय ३१, रा. उत्तमनगर, बावधन, पुणे, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली. मृत मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील बांधकाम मजूर आहेत. पत्नी आणि चार मुलांसह ते वाकड येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी (दि. २४) सायंकाळी त्यांचा आठवर्षीय मुलगा घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला. पोलिसांनी सुरुवातीला अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल केला. वाकड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मुलगा एका संशयित व्यक्तीसोबत पायी जाताना दिसला. पोलिसांनी संशयित पवन याची ओळख पटवून त्याला बावधन येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे सांगितले.

दरम्यान, पवन बावधन येथे दीड महिन्यापूर्वी आला. तीन दिवसांपूर्वीच वाकड येथे रसवंतिगृहात तो कामाला आला. तो आठवर्षीय मुलाला उसाचा रस प्यायला द्यायचा. शनिवारी सायंकाळी मुलगा खेळत होता. त्याने मुलाला वडापावचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याला बावधन येथे नेले. पाषाण तलावाजळ त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. मुलगा अत्याचाराबाबत कोणालाही सांगू शकतो, या भीतीने पवन याने मारहाण करून त्याचा गळा आवळला. यात मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलाचा मृतदेह झुडुपामध्ये टाकून दिला.

रसवंतिगृह मालकावर कारवाई

रसवंतिगृह मालकाने पवनला कामावर घेताना त्याची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी केली नाही. कामगारांची पोलिसांना माहिती दिली नाही. यामुळे या मालकावर पोलिसांनी कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

सह्याद्रीत मुसळधार पावसाचा कहर; महाबळेश्वरात दरडी कोसळल्या, राज्यात मृतांचा आकडा १५ वर

0
पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी, मावळ आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली...

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा ‘सायबर वॉच’; समाजविघातक कंटेंटविरोधात विशेष मोहीम

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जळगाव पोलिसांनी समाजात चुकीचे संदेश पसरविणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओंविरोधात विशेष सायबर...

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी डिजिटल शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक येथील मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्था येथे अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक...

सिन्नरमध्ये बॅनरबाजीवरून प्रश्नचिन्ह; प्रशासनाची डोळेझाक?

0
  सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)सिन्नर शहरात विविध ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बॅनर, फ्लेक्स व मंडप उभारले जात असल्याची चर्चा असून, याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप...

error: Content is protected !!