Homeताज्या बातम्यापुणे मेट्रोची भन्नाट योजना; पुणेकरांसाठी धावत्या मेट्रोतही लग्न, वाढदिवस, साखरपुडा सोहळा पार...

पुणे मेट्रोची भन्नाट योजना; पुणेकरांसाठी धावत्या मेट्रोतही लग्न, वाढदिवस, साखरपुडा सोहळा पार पडणार..

पुणे मेट्रोची भन्नाट योजना; पुणेकरांसाठी धावत्या मेट्रोतही लग्न, वाढदिवस, साखरपुडा सोहळा पार पडणार..

पुणे :- पुणेकरांना आता लवकरच मेट्रोतून (Metro) प्रवास करता येणार आहे. मेट्रो लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी प्रशासनानं मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे. जुलै महिन्यात पुण्यातील कोथरुड येथून वनाझ कॉर्नर (मेट्रो डेपो) ते आनंद नगर या मार्गावर प्रथमच मेट्रोची चाचणी पार पडली. त्यामुळे, पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होईल. विशेष म्हणजे या मेट्रोत पुणकरांना वाढदिवस, लग्न, साखरपुडा यांसारखे कार्यक्रमही साजरे करता येणार आहेत.

कौटुंबिक सोहळा असो किंवा मित्रांसोबत वाढदिवस साजरा करायचा म्हटलं की, हॉलपासून सगळ नियोजन करावं लागतं. मात्र, मेट्रोचा डब्बाच तुमच्यासाठी हॉल असेल तर. भन्नाट कल्पना आहे ना ही, धावत्या मेट्रोत तुमचं लग्न किंवा वाढदिवस साजरा केला तर तो संस्मरणीय ठरणार हे नक्की. लहान मुलांचा वाढदिवस असो किंवा विवाहाचा वाढदिवस, प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या विशेष दिवस साजरा करण्यासाठी मेट्रोचा वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे अल्प शुल्कात पुणेकरांना हे मंगलसोहळे धावत्या मेट्रोमध्ये साजरा करता येणार आहेत.

पुण्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते वल्लभनगर आणि वनाझ ते गरवारे महाविद्यालय दरम्यान डिसेंबर अखेर ही मेट्रो धावणार आहे. त्यामुळे मेट्रोमध्ये जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रो लहान मोठे वैयक्तिक, कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देणार आहे. त्यामुळे, आपल्या मंगलसोहळ्याचा आनंद द्विगुणीत होईल. अर्थातच, हा सोहळाही एका कायमची आठवण बनून स्मरणात राहिल.

या सोहळ्यांना कोणाला मिळेल परवानगी ?

● विवाहाची बोलणी

● साखरपुडा

● विवाह सोहळा

● विवाहाचा वाढदिवस

● लहान मुलांचे व ज्येष्ठांचे वाढदिवस

● खर्च सभागृहाच्या भाड्यापेक्षाही कमी असणार

सध्या नागपूर मेट्रोमध्येही अशा प्रकारचे अभिनव उपक्रम साजरे होतात. पुण्यातही तीस स्थानकांत हे उपक्रम, सोहळे राबविण्याचे नियोजन असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!