Homeताज्या बातम्यारेमडीसीवर इंजेक्शनाचा काळाबाजार करणाऱ्या फार्मासिस्टला कोंढवा पोलिसांनी केले अटक...

रेमडीसीवर इंजेक्शनाचा काळाबाजार करणाऱ्या फार्मासिस्टला कोंढवा पोलिसांनी केले अटक…

रेमडीसीवर इंजेक्शनाचा काळाबाजार करणाऱ्या फार्मासिस्टला कोंढवा पोलिसांनी केले अटक…

पुणे :- सध्या कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर झालेली असताना, दि.२१ एप्रिल रोजी कोंढवा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद यांना अंकित विनोद सोलंकी नावाचा इसम हा जायका हॉटेल कोंढवा येथे कोराना १९ रुग्णांना अत्यावश्यक असणारे रेमडिसीवर इंजेक्शन हे विनापरवाना चढया दराने विक्री करत आहे,” अशी बातमी प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद यांनी साध्यावेशामध्ये तपास पथक अधिकारी प्रभाकर कापुरे व पोलीस अंमलदार यांचे छापा पथक तयार करुन बनावट गिऱ्हाईक यास अंकित विनोद सोलंकी याच्याकडे रेमडिसीवर इंजेक्शन घेणेकामी पाठविले. सदर रेमडिसीवर इंजेक्शन विक्री करणारा इसम अंकित विनोद सोळंकी वय-२६ वर्ष, धंदा- फार्मासिस्ट, रा. फ्लॅट नं-३०१, सुखवानी कॉम्पलेक्स, ११ नं बस स्टॉप मागे, दापोडी, पुणे हा जायका हॉटेलच्या जवळ येवुन आडबाजुस बनावट ग्राहकास घेवुन जावुन त्यास दोन इंजेक्शन दाखवुन, एका इंजेक्शनसाठी १०,०००/- रु मागणी केली. तसेच एका इंजेक्शनची १०,०००/- रु रोख रक्‍कम स्विकारुन १०,०००/- रु रक्‍कम ऑनलाईन स्वरुपात मागणी करत असताना त्यास छापा टाकुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे रेमडिसीवर इंजेक्शनाबाबत तपास केला असता त्याने सदर रेमडिसीवर इंजेक्शन हे डॉक्टरांनी ज्या पेशंन्टला आवश्यकता आहे, त्यांना प्रिरक्रीप्णन लिहुन दिलेले असते, ते प्रिर्क्रीप्शन चोरी करुन त्याचा गैरवापर करुन ससुन हॉस्पीटल येथील संजीवनी मेडिकल स्टोअर्स मधुन खरेदी केले असल्याचे सांगितले. तसेच ते इंजेक्शन चढया भावामध्ये काळयाबाजारे विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली असल्याने त्याच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे गुरन ३३५/२०२१, भादंवि कलम ४२० सह परिच्छेद-२६ औषध किंमत नियंत्रण आदेश-२०१३, सह वाचन कलम ३(२)(सी) जीवनावश्यक वस्तुंचे अधिनियम-१९५५ चे उल्लंघन दंडनिय कलम-७(१)(ए)(२) तसेच औषध व सौंदर्य प्रसाधणे कायदा-१९४० चे कलम १८(सी) चे उल्लंघन दंडनिय कलम- २७(बी)(२), कलम-१८ए व कलम २२(ए)(सीसीए) चे उल्लंघन अनुक्रमे दंडनिय कलम २८ व कलम २७ डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चालु आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!