Homeताज्या बातम्या‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत राज्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर...

‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत राज्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर…

सर्वसामान्यांसह व्यापारी, दुकानदारांना महाविकास आघाडी सरकारचा मोठा दिलासा…
राज्य सरकार सरकारने ‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत नवी नियमावली आज जाहीर केली आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील २५ जिल्ह्यांमधील नियम शिथील करण्यात आले असून वीकेंड लॉकडाऊनमध्येही काहीसा दिलासा देण्यात आला आहे. येत्या ४ ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होईल. नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने दुकानदार आणि व्यापारी वर्गाला दिलासा मिळणार आहे. मात्र, या नियमावलीअंतर्गत राज्यातील रुग्णसंख्या अधिक असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये लेवल ३ चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत . यामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर,  बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात जुन्या नियमवालीतून वगळण्याबाबतचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत घेण्यात येणार आहे.  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता जनतेने सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवी नियमावली :-
– सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकानं खुली ठेवण्यास परवानगी.
– शनिवारी दुपारी ३ पर्यंत सर्व दुकाने खुली राहणार
–  रविवार वगळता मॉल्स देखील खुले राहणार
– रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू
– सर्व खासगी आणि शासकीय कार्यालयं ही संपूर्ण क्षमतेने खुली राहणार
– सर्व उद्याने, मैदाने खुली राहणार
– हॉटेल्स दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने खुली राहतील. विकेंडला केवळ पार्सल सेवा सुरू राहील.
– ब्युटी पार्लर, स्पा, हेअर सलून, जिम, योगा क्लासेस सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, शनिवारी दुपारी ३ पर्यंत ५०  टक्के क्षमतेने खुले राहणार, रविवारी पूर्ण बंद राहतील.
– सिनेमागृह, मस्टिप्लेक्सना अद्याप परवानगी नाही.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!