Homeताज्या बातम्यामहापुरुषांच्या पुतळ्यांसमोर नृत्यप्रकार; भाजपच्या प्रचारपद्धतीवर विरोधकांचा संताप

महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर नृत्यप्रकार; भाजपच्या प्रचारपद्धतीवर विरोधकांचा संताप

Times of Maharashtra : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी नवनव्या पद्धती अवलंबताना दिसत आहेत. डिजिटल प्रचार, सेलिब्रिटींची उपस्थिती, मोठ्या नेत्यांच्या सभा यामुळे निवडणूक वातावरण तापले आहे. मात्र मुंबईतील एका प्रभागातील भाजप उमेदवाराच्या प्रचारामुळे नवाच वाद निर्माण झाला आहे.

मुंबईच्या वॉर्ड क्रमांक १५७ मध्ये भाजप उमेदवार आशाताई तायडे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान चक्का महिलांच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा नृत्यप्रकार थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर झाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते अखिल चित्रे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. निवडणूक प्रचारासाठी भाजप महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे आणि त्यांना हेही भान नाही की मागे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाला संविधान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत, असा आरोप त्यांनी केला.

महापुरुषांच्या प्रतिमांसमोर असा प्रकार करून महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवले आहे? असा सवाल उपस्थित करत अखिल चित्रे यांनी भाजप मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनाही आपल्या पोस्टमध्ये थेट मेन्शन केले आहे.

याशिवाय, या कार्यक्रमाचे आयोजक भाजपचे स्थानिक उमेदवार असून संयोजक म्हणून पवन त्रिपाठी यांचे नाव समोर आले आहे. सिद्धिविनायक ट्रस्टवर भाजपाने कोषाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेल्या व्यक्तीकडून असे कृत्य होत असल्याबद्दलही चित्रे यांनी नाराजी व्यक्त केली. “अशा व्यक्तींना पवित्र मंदिराच्या ट्रस्टवर नेमताना भाजपाला लाज वाटली नाही का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मुंबईकरांनी आपल्या महापुरुषांचा अपमान कदापि सहन करू नये. सत्तेच्या मस्तीने डोळे झाकलेल्या लोकांना योग्य धडा शिकवण्याची संधी वारंवार मिळत नाही,असे आवाहन करत अखिल चित्रे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणामुळे निवडणूक प्रचारातील मर्यादा आणि राजकीय संस्कृतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात...

राज्यस्तरीय पुरस्काराने नवनाथ आव्हाड यांचा गौरव

0
सिन्नर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ आव्हाड यांना माता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२६" या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दोडी...

भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच….

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना करण्यात यावी याकरिता ॲड. डॉ.अरूण जाधव भटक्या विमुक्त समाजाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "मुशाफिरी...

गेवराईचे तहसीलदार हटवा, गोदावरी वाचवा; अवैध वाळू उपशावर नागरिकांचा संताप

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोदाकाठच्या...

दौंड पोलिसांची धडक कारवाई; १९ बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेंसर जप्त

0
दौंड, (प्रतिनिधी-मयुर साळवे,संघराज गायकवाड): दौंड शहर व परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरयुक्त बुलेट व मोटारसायकलींवर दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली....

error: Content is protected !!