Homeताज्या बातम्याहडपसर परिसरात धोकादायक होर्डिंग; नागरिकांची कारवाईची मागणी...

हडपसर परिसरात धोकादायक होर्डिंग; नागरिकांची कारवाईची मागणी…

हडपसर परिसरात धोकादायक होर्डिंग; नागरिकांची कारवाईची मागणी…

पुणे : हडपसर, मांजरी परिसरात सोलापूर रोड, सासवड रस्त्यासह महापालिकेच्या हद्दीत ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. होर्डिंग व्यावसायिकांनी रस्त्यांवर आवाढव्य आकाराची होर्डिंग उभारली आहेत.

महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सोलापूर महामार्गवरील मांजरी बुद्रुक, तर सासवड मार्गावर फुरसुंगी, उरुळी देवाची, वडकी आदी गावांच्या हद्दीत शेकडो होर्डिंग्ज उभारले आहेत. त्यातील अनेक होर्डिंग अनधिकृत व धोकादायक आहेत. वादळ-वार्‍यांत नुकसान झालेले होर्डिंगही तसेच उभे आहेत. परिसरातील अनेक होर्डिंगसाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सोलापूर महामार्गावरील लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाका या मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत अनेक होर्डिंग धोकादायकपणे उभी आहेत.

महादेवनगर मांजरी रस्ता, मुंढवा-मांजरी रस्ता, मांजरी- शेवाळवाडी रस्ता, द्राक्ष संशोधन केंद्र ते मांजरी गाव रस्ता आदी चौकांत व रस्त्यांवर तर या होर्डिंगचा कहरच झाला आहे. टोलनाक्याच्या परिसरात कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत भव्य आकाराची होर्डिंग्ज उभारली आहेत. यातील अनेक होर्डिंग्जची बांधणी जुनी असल्याने ते केव्हाही कोसळण्याचा धोका आहे. घाटकोपर येथे नुकतेच होर्डिंग कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, या पार्श्वभूमीवर हडपसर परिसरात अनधिकृत होर्डिंग लावण्यावर कायमस्वरूपी बंदी यावी, अशी मागणी हडपसर नागरिक मंचाने केली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत होर्डिंगधारकांना नोटीस दिलेल्या होत्या, मात्र होर्डिंग उतरविण्यात आले नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!