दौंड: पहिल्याच पावसाने समता नगर जलमय, नगरपालिका प्रशासनाची सुस्ती कायम…

दौंड: पहिल्याच पावसाने समता नगर जलमय, नगरपालिका प्रशासनाची सुस्ती कायम…
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयूर साळवे)

 

दौंड शहरातील समता नगर परिसरात पहिल्याच पावसाने रस्त्यांचा जलमय हाल झाला आहे. रस्त्यांवर पाणी की पाण्यात रस्ते, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. खराब ड्रेनेज व्यवस्था आणि गटारींची साफसफाई न झाल्याने पाणी साचून रस्ते खड्डेमय झाले आहेत. यामुळे पादचारी, वाहनचालक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांनी दौंड नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी नोंदवल्या, पण प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे कोणतीही कारवाई झालेली नाही.

“पहिल्या पावसातच रस्त्यांची ही अवस्था, पुढे काय होणार?” अशी संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवासी यांनी व्यक्त केली. “गटारी साफ नसल्याने पाणी साचते, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे,” अशी खंत येथील नागरिकांनी यांनी मांडली. “नगरपालिका कर वसूल करते, पण मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करते. रस्त्यांची दुरुस्ती आणि गटारींची साफसफाई तातडीने हवी.” नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत आहे.

पावसाळा तोंडावर असताना प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे. नागरिकांचा संताप वाढत असून, प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

👇👇👇Advertisement👇👇👇
👆👆👆Advertisement👆👆👆