Homeमहत्त्वाचेडॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त

डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त

Times Of Maharashtra Desk : राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते कोकण विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असून शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शहराच्या प्रशासनाची धुरा आता त्यांच्या खांद्यावर येणार आहे.

डॉ. सूर्यवंशी हे २००६ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सातारा सैनिक स्कूल तसेच नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे त्यांनी पीएच.डी. (व्यवस्थापन), एमबीए (मार्केटिंग), एलएलबी आणि बीएससी (फिजिक्स) असे शिक्षण पूर्ण केले आहे.

९ मार्च २०१२ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) येथे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत प्रभावी प्रशासनाची छाप पाडली.

जिल्हा परिषद कोल्हापूर व पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी ग्रामीण विकासाच्या विविध योजनांना गती दिली. त्यानंतर गोंदिया आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना प्रशासनातील पारदर्शकता व विकास प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) येथे अतिरिक्त आयुक्त, तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. कोकण विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असताना विभागातील प्रशासन सुसूत्र करण्याबरोबरच विविध विकास योजनांवर त्यांनी विशेष भर दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) :  तालुक्यातील गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाची धडक कारवाई

0
रुपेश देशमुख  ( ब्रम्हपुरी प्रतिनिधी ) : सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाच्या तुटवड्याची शक्यता लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सतर्क झाले असून घरगुती...

भाजपचा आरोप धादांत खोटा; ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प विकासाभिमुखच

0
रुपेश देशमुख(प्रतिनिधी ब्रम्हपुरी ) : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, त्याद्वारे जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा...

मध्यरात्रीचा ‘सत्याग्रह’ दडपण्याचा प्रयत्न : लोहारडोंगरी खाण प्रकरणात पोलिसांच्या कारवाईने निर्माण केले गंभीर प्रश्न.

0
निलेश ठाकरे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र स्टेट न्युज हेड) : लोकशाही व्यवस्थेत एखाद्या प्रश्नावर संविधानिक मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु...

रेल्वे नोकरीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक : आरोपी मोकाट, पोलिसांची कार्यवाही कुठे अडकली?

0
निलेश ठाकरे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्युज - स्टेट हेड) : चंद्रपूर जिल्ह्यात बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांवर घाला घालणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे...

error: Content is protected !!