Homeउद्योगघरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाची धडक कारवाई

घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाची धडक कारवाई

रुपेश देशमुख  ( ब्रम्हपुरी प्रतिनिधी ) : सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाच्या तुटवड्याची शक्यता लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सतर्क झाले असून घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापराविरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी चंद्रपूर व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसीलदार सतीश मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेदरम्यान ब्रम्हपुरी शहरातील गुलमोहर बिर्याणी सेंटर व हिंदुस्थान हॉटेल येथे घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यावसायिक वापर केल्याचे आढळून आले. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अंतर्गत पुरवठा निरीक्षक महेंद्र रामटेके यांनी संबंधितांवर गुन्हा नोंदविला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले की, घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणे तसेच अवैध साठवणूक करणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

तालुक्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, व्यावसायिक प्रतिष्ठाने, गॅस एजन्सी तसेच अवैध साठवणूक असलेल्या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. पुरवठा निरीक्षण अधिकारी अमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र रामटेके, दिलीप मेश्राम, राजेश आंबाघरे यांच्यासह तालुकास्तरीय पथक कार्यरत आहे. याशिवाय मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या माध्यमातून मंडळनिहाय सहा पथके तयार करण्यात आली असून या कारवाईत पोलीस विभागाचेही सहकार्य राहणार आहे.

दरम्यान तालुक्यातील चारही गॅस एजन्सीकडे घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नोंदणीकृत ग्राहकांना ओटीपी प्रणालीद्वारेच गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच गॅस एजन्सीमध्ये अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन तहसीलदार सतीश मासाळ यांनी केले आहे.

घरगुती गॅसबाबत कोणतीही अडचण आल्यास संबंधित गॅस कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी किंवा तहसील कार्यालय, ब्रम्हपुरी येथील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!