Homeक्राईमचालकाने केला ₹1.5 लाखांचा माल गायब लोखंडी पार्ट्सची विक्री करून चालक फरार

चालकाने केला ₹1.5 लाखांचा माल गायब लोखंडी पार्ट्सची विक्री करून चालक फरार

Times Of Maharashtra Desk : चाकणमधील मालवाहतुकीच्या व्यवसायाला धक्का देणारी एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. पिकअप गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या तरुणाने मालकाचा विश्वासघात करत सुमारे दीड लाख रुपयांच्या मालाचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सोनल बलभीम अरडे (वय ३१, रा. चाकण) यांच्या बोलेरो पिकअप गाडीवर इरफान अन्सारी (वय २६, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा चालक म्हणून कार्यरत होता. ९ फेब्रुवारी रोजी गाडीत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे लोखंडी सुटे भाग (पार्ट्स) भरून ते मोशी येथून नऱ्हे येथील एका खासगी कंपनीत पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती.

मात्र, संबंधित कंपनीकडे माल वेळेत न पोहोचल्याने मालकांनी चौकशी सुरू केली. तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघडकीस आली. आरोपी इरफान अन्सारी याने माल नऱ्हे येथे पोहोचवण्याऐवजी वाटेतच लोखंडी सुटे भागांची परस्पर विक्री केली आणि त्यातून मिळालेली रक्कम स्वतःकडे ठेवली.

चोरी उघड होऊ नये म्हणून त्याने बोलेरो पिकअप गाडी नवी मुंबई विमानतळ परिसरात बेवारस अवस्थेत सोडून दिली आणि तेथून फरार झाला. घटनेनंतर मालकांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.

पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, त्याच्याविरुद्ध विश्वासघात व अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे औद्योगिक भागातील मालवाहतूक व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निफाड तालुक्याचे शान, नव्यानिर्वाचित आमदार निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगावात भव्य सत्कार

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव व योगेश कर्डिले): निफाड तालुक्याचे शान आणि नव्यानिर्वाचित आमदार, निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगाव ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि...

पुरोगामी महाराष्ट्र फक्त भाषणातच? कृतीत मात्र वाढता जातीयवाद आणि स्वार्थी राजकारण

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज — न्याय, समानता आणि सर्वसमभावाच्या विचारांना राजकीय स्वार्थाचा फटका. महाराष्ट्राची ओळख ही केवळ भौगोलिक सीमांमुळे नाही, तर सामाजिक...

गेवराईत विशेष मतदार यादी पुनरीक्षणासाठी BLO, पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): निवडणूक भारत आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, सर्वसमावेशक व त्रुटीमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत गेवराई...

पाणीटंचाईवर मात; रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना कर सवलत!

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): आजचे बदलणारे हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि वाढती पाण्याची मागणी यामुळे भूजल पातळी सातत्याने घटत चालली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर, भविष्यातील...

जीवघेण्या पॉलीट्रॉमावर मात: अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे 50 हून अधिक डॉक्टर आणि आरोग्यसेवकांनी...

0
नवी मुंबई, 25 जून 2026: 37 वर्षीय मर्चंट नेव्हीतील रँकिंग ऑफिसर मृत्यूच्या दारातून परत आला असून आज तो पुन्हा स्वतःच्या पायावर उभा आहे. अपोलो...

error: Content is protected !!