Homeपर्यावरणगोदावरी नदीचे सौंदर्य धोक्यात, ‘काळ्या सोन्या’ची खुलेआम लूट, मातीचे कृत्रिम पर्वत उभे

गोदावरी नदीचे सौंदर्य धोक्यात, ‘काळ्या सोन्या’ची खुलेआम लूट, मातीचे कृत्रिम पर्वत उभे

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  गेवराई मतदारसंघातील गोदावरीनदी व सिंदफणानदी या दोन वाहणाऱ्या नदी चे नैसर्गिक सौंदर्य सध्या गंभीर धोक्यात आले आहे. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तसेच वीटभट्ट्यांसाठी लागणाऱ्या काळ्या मातीचे अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असून, पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.

विशेषत तालुक्यातील काही दलालांनी संगनमताने नदीपात्रातील ‘काळे सोने’ मानली जाणारी सुपीक माती उपसून त्याचा मोठा साठा करून ठेवला आहे. गेवराई शहरात व परिसरात तर या मातीचा वापर करून वीटभट्ट्यांसाठी कृत्रिमरित्या मोठमोठे मातीचे ‘पर्वत’ उभे करण्यात आले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे खामगाव आगरनांदूर राक्षसभुवन राजापूर पुलालगत सुमारे २०० मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या उत्खननामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल होण्याची शक्यता असून पुलालाही धोका निर्माण होऊ शकतो.

नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून, बाहेर काढलेल्या मातीचे प्रचंड ढिगारे साठवले जात आहेत. यामुळे परिसराच्या भौगोलिक रचनेत बदल होत असून शेती, रस्ते आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महसूल व पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अवैध उत्खनन त्वरित थांबवावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!