गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील भगवान नगर येथील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच गेवराई शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. शांत, मनमिळावू आणि समाजात आदराचे स्थान असलेल्या श्रीरंगराव काकडे यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गेवराई तालुक्यातील शेतकरी, नातेवाईक, मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, वकील, इंजिनियर तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी श्रीरंगराव काकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
श्रीरंगराव काकडे हे गेवराई शहरातील गणेश नगर येथील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक प्रल्हाद शिंदे यांचे जवळचे नातेवाईक होते. त्यांच्या निधनामुळे शिंदे परिवारासह परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.






















