Homeताज्या बातम्याओबीसीच्या फेरसर्वेक्षण करण्यास सरकारची टाळाटाळ....

ओबीसीच्या फेरसर्वेक्षण करण्यास सरकारची टाळाटाळ….

ओबीसीच्या फेरसर्वेक्षण करण्यास सरकारची टाळाटाळ….

पुणे : महाराष्ट्रामध्ये स्थितीला इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) व त्याचे उपवर्ग मिळून ३२ टक्के आरक्षण आहे. सदरचे आरक्षण हे घटनाबाह्य असल्याने मराठा सेवक समितीने मराठा सेवक प्रशांत भोसले यांचे माध्यमातून उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल केलेली आहे.

मात्र, सरकार फेरसर्वेक्षण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मराठा सेवक समितीचे प्रशांत भोसले आणि प्रमोद आरसुळ यांनी पत्रकार परिषदेत केला.

ही याचिका २५ जानेवारी २०२२ रोजी दाखल केलेली आहे. महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) असणाऱ्या सर्व जातींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग कायदा २००५ नुसार प्रत्येक दहा वर्षांने आवश्यक असणारे ओबीसींचे सर्वेक्षण करण्यात यावे, १९६७, १९९४, १९९५ साली ओबीसी आरक्षणाबाबत काढण्यात आलेले घटनाबाह्य व बेकायदेशीर शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावेत व आरक्षणास स्थगिती द्यावी, खुल्या प्रवर्गातील ओबीसी अतिक्रमण यामुळे वाढलेले प्रतिनिधित्व तपासावे, महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जातींचा इंपेरिकल डेटा सादर करावा या मुद्यांवर या याचिकेत सुनावणी सुरू आहे.

या याचिकेमध्ये महाराष्ट्र सरकार, राज्य मागासवर्ग आयोग, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग यांचे सोबतच रजिस्टर जनरल तथा आयुक्त राष्ट्रीय जनगणना विभाग, आयुक्त राज्य जनगणना आयुक्त यांना देखील प्रतिवादी करण्यात आलेले आहे. राज्य सरकार कोणत्याही कामकाजाशिवाय चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या याचिका कोणाचीही मागणी नसताना आमच्या याचिकेशी जोडून वेळकाढुपणा व ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रकरणात राज्याचे महाधिवक्ता यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागण्यात आला असून मुख्य न्यायाधीश यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी पुढील सुनावणी ठेवलेली आहे, तर सरकार आणि आयोगाला त्यांचे म्हणणे १० डिसेंबर पर्यंत न्यायालयात दाखल करण्यास सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

error: Content is protected !!