Homeताज्या बातम्याहाजी फिरोज शेख यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्षपदी नियुक्ती – राष्ट्रवादीच्या...

हाजी फिरोज शेख यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्षपदी नियुक्ती – राष्ट्रवादीच्या इतिहासातील ऐतिहासिक नियुक्ती ; मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण…

हाजी फिरोज शेख यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्षपदी नियुक्ती – राष्ट्रवादीच्या इतिहासातील ऐतिहासिक नियुक्ती ; मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण…

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत पुणे शहरातील मुस्लिम समाजातील कोणालाही फाथर बॉडीत कार्याध्यक्षपदाची संधी मिळालेली नव्हती. मात्र, ही परंपरा तोडत कोंढवा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कोंढवा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी फिरोज शेख यांची नुकतीच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मुस्लिम समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
हाजी फिरोज शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी कोंढवा, हडपसर परिसरातील विविध प्रश्नांवर संघर्ष करत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांचा जनसंपर्क मोठा असून, सर्व समाजघटकांमध्ये त्यांची एक विश्वासार्ह प्रतिमा तयार झाली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांची पत्नी पुणे महापालिकेच्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या आणि त्या कार्यकाळात त्यांनी परिसरातील विकासकामे प्रामाणिकपणे पूर्ण केली. नुकत्याच पार पडलेल्या हडपसर विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या प्रचारासाठी हाजी फिरोज शेख यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांनी पक्षासाठी अतिशय निष्ठेने काम केले असून त्यांच्या योगदानाची दखल घेऊनच पक्षाने त्यांना पुणे शहर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇
Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image above👆👆
या निवडीमुळे मुस्लिम समाजात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रथमच असा मोठा सन्मान देण्यात आला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे की पक्ष मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाला योग्य स्थान देत आहे. हाजी फिरोज शेख यांची ही निवड समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्याद्वारे अधिकाधिक युवक राजकारणात सक्रिय होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हाजी फिरोज शेख यांचे कार्य, त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन हे पक्षासाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटन बळकट होणार असून, पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन ऊर्जा मिळेल. ही निवड म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती आहे.
या ऐतिहासिक निर्णयाचे मुस्लिम समाजात विशेष स्वागत होत असून, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हाजी फिरोज शेख यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध संघटना आणि नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांच्या नेतृत्वात पक्ष अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) :  तालुक्यातील गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाची धडक कारवाई

0
रुपेश देशमुख  ( ब्रम्हपुरी प्रतिनिधी ) : सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाच्या तुटवड्याची शक्यता लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सतर्क झाले असून घरगुती...

डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त

0
Times Of Maharashtra Desk : राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते कोकण विभागीय आयुक्त...

भाजपचा आरोप धादांत खोटा; ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प विकासाभिमुखच

0
रुपेश देशमुख(प्रतिनिधी ब्रम्हपुरी ) : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, त्याद्वारे जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा...

मध्यरात्रीचा ‘सत्याग्रह’ दडपण्याचा प्रयत्न : लोहारडोंगरी खाण प्रकरणात पोलिसांच्या कारवाईने निर्माण केले गंभीर प्रश्न.

0
निलेश ठाकरे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र स्टेट न्युज हेड) : लोकशाही व्यवस्थेत एखाद्या प्रश्नावर संविधानिक मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु...

error: Content is protected !!