पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्समध्ये ४.५८ कोटींची सोन्याची चोरी; सेल्समनचा कारनामा ऐकून हादरून जाल

पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्समध्ये ४.५८ कोटींची सोन्याची चोरी; सेल्समनचा कारनामा ऐकून हादरून जाल
पुणे : शहरातल्या  नामांकित ज्वेलर्स शोरूममध्ये तब्बल ४.५८ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले असून, ही चोरी दुकानातीलच एका सेल्समनने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिस तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत.

 

ही घटना लक्ष्मी रोडवरील एका प्रसिद्ध ज्वेलरी शोरूममध्ये घडली. गेल्या काही महिन्यांपासून सतत स्टॉक कमी होत असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदी तपासून पाहण्यात आल्या असता, एका सेल्समनवर संशय बळावला. हा सेल्समन मागील आठ ते नऊ महिन्यांपासून छोटे-छोटे दागिने चोरून ते विक्रीस काढत होता, असे तपासात समोर आले.

पोलिसांनी सदर सेल्समनला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे ४.५८ कोटी रुपयांच्या सोन्याचे हिशेब सापडले आहेत. त्याने हा पैसा विविध बँक खात्यांमध्ये वळवले असून, काही रक्कम त्याने संपत्तीत गुंतवली असल्याची माहिती देखील तपास यंत्रणांना मिळाली आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image above👇👇
Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image above👆👆

 

 

शहर पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, “या प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा संशय आहे. आम्ही सखोल तपास करत आहोत. दुकान व्यवस्थापनाच्या सतर्कतेमुळे ही मोठी चोरी वेळेत उघडकीस आली.”

या घटनेमुळे शहरातील ज्वेलर्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने अंतर्गत कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पोलिस तपास सुरू असून, आणखी काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.