Homeमहाराष्ट्रजळगावमध्ये भव्य हिंदू संमेलन; सामाजिक एकतेचा संदेश

जळगावमध्ये भव्य हिंदू संमेलन; सामाजिक एकतेचा संदेश

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातील अयोध्या नगर परिसरात हिंदू समाजाच्या ऐक्य, समरसता आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देणारे “भव्य हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले असून, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून बंधुभाव दृढ करण्यासोबतच सामाजिक एकात्मतेची भावना अधिक बळकट करण्याचा या संमेलनाचा उद्देश आहे.

“हिंदवः सोदराः वै, न हिंदू पतितो भवेत्। मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्रः समानता॥” या विचारधारेवर आधारित या संमेलनातून हिंदू समाजातील परस्पर सहकार्य, समता आणि संस्कृती जपण्याचा संदेश दिला जाणार आहे. परंपरा आणि मूल्यांचे संवर्धन करत भविष्यात अधिक सक्षम आणि संघटित समाज उभा करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला जाणार आहे.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सामाजिक समरसता मंचाचे श्री. रमेश बापू महाजन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ह.भ.प. श्री. पांडुरंग नरसिंह बोधले (जळगाव) यांचे आशीर्वचन लाभणार असून, त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे उपस्थितांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सदर संमेलन गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बि.यु.एन. रायसोनी शाळा, अयोध्या नगर, जळगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमास हिंदू समाजातील सर्व घटकांनी कुटुंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या उपक्रमाचे आयोजन हिंदू संमेलन समिती, अयोध्या नगर यांच्या वतीने करण्यात आले असून, समाजहिताच्या या कार्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही आयोजकांनी नमूद केले आहे. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव शहर प्रचार विभाग सदस्य प्रशांत विसपुते यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

error: Content is protected !!