Homeताज्या बातम्याकरिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर‌’ पुस्तक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक : डॉ. सुरेश गोसावी डॉ. दीपक...

करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर‌’ पुस्तक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक : डॉ. सुरेश गोसावी डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‌‘करिअर दिशा..

पुणे : आजच्या काळात विद्यार्थ्यांनी दूरदृष्टी ठेवून विविध विषयात कौशल्यविकास साधणे आवश्यक आहे. या करिता डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‌‘ करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर‌’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. मातृभाषेतून लिखाण हा दृष्टीकोन अभिमानास्पद असून करिअरमधील विविध क्षेत्रांविषयी तज्ज्ञ लेखकांनी मांडलेली माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.

विश्वास प्रकाशनतर्फे प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‌‘करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर‌’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. गणेशखिंड येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेजच्या सभागृहात आज (दि. 15) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यावाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, ज्येष्ठ संशोधक डॉ. अरविंद नातू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, विश्वास प्रकाशनच्या संचालिका वैशाली कार्लेकर मंचावर होते.

पुस्तकाविषयी माहिती सांगताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, करिअर दिशा..‌’ या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयातील करिअरच्या संधींविषयी तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाच्या बरोबरीने विविध विषयातील कौशल्यविकास साधणे तसेच शिक्षण घेत असतानाच कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना डॉ. अरविंद नातू म्हणाले, आजच्या शिक्षणात संशोधनाचा अभाव जाणवतो. मुलांना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रात कार्य करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. त्या करिता आंतरशाखीय शिक्षण उपयुक्त ठरेल.

करिअरच्या संधी शोधण्यासाठी ‌‘करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर‌’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी व्यक्त केला. पुस्तकातील लेख अभ्यासपूर्ण असल्याचे डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी तर सूत्रसंचालन वैशाली कार्लेकर यांनी केले. आभार डॉ. शुभांगी भातांब्रेकर यांनी मानले.

फोटो ओळ : ‌‘करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर‌’ पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) डॉ. आदित्य अभ्यंकर, डॉ. अरविंद नातू, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. दीपक शिकारपूर, वैशाली कार्लेकर, डॉ. संजय खरात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

error: Content is protected !!