Homeआरोग्यसिन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; नांदूर शिंगोटे येथे वन विभागाचा पिंजरा

सिन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; नांदूर शिंगोटे येथे वन विभागाचा पिंजरा

नवनाथ आव्हाड ( नाशिक प्रतिनिधी ) : सिन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असून नांदूर शिंगोटे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात बिबट्याचे दर्शन नवे नसले तरी अलीकडील घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास नांदूर शिंगोटे येथील शेळके वस्तीवर बाळू नथू शेळके हे मेथीची भाजी काढण्यासाठी शेतात गेले असता त्यांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले. घाबरलेल्या शेळके यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील शेतकरी तात्काळ घटनास्थळी जमा झाले. लोकांची चाहूल लागताच बिबट्याने प्रकाश शेळके यांच्या मक्याच्या शेतात धूम ठोकली.

या घटनेमुळे दिवसभर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. संध्याकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पुन्हा दिसून आला. तो मक्याच्या शेताजवळील विहिरीवर पाणी पिण्यासाठी आल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच बाळू शेळके यांनी परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत रात्रभर जागून पहारा दिला.

शनिवारी सकाळी या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत मक्याच्या शेतात पिंजरा लावला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येत आहेत.

दरम्यान, परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण असून लहान मुले व महिलांना बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वन विभागाने नागरिकांनी सतर्क राहावे व बिबट्याचे दर्शन झाल्यास तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!