Homeआरोग्य'एक धागा सुखाचा'जीवनाच्या जरतारी वस्त्रातील तात्विक सत्य उलगडणारा विचारप्रवाह- तहसीलदार ...

‘एक धागा सुखाचा’जीवनाच्या जरतारी वस्त्रातील तात्विक सत्य उलगडणारा विचारप्रवाह- तहसीलदार शेळके

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : एक धागा सुखाचा, शंभर धागे ए वत्र माणसा तुझिया आयुष्याचे वा ओळी ऐकल्या की मनात एक वेगळीच हळुवार भाबना जागी होते. ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीने साकारलेले आणि सुधीर फडके यांच्या स्वरांनी सजलेले हे गीत केवळ गाणे नसून संपूर्ण जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारा आरसा आहे. माणसाच्या आयुष्याचा अर्थ काय, सुख आणि दःख यांचे नाते काय, जीवनातील प्रवास कसा असतो, याचे अत्यंत प्रभावी आणि साध्या शब्दांत केलेले हे वर्णन प्रत्येकाला अंतर्मुख करून जाते. आयुष्य म्हणजे काय, हा प्रश्न प्रत्येकाला कधीतरी पडतोच.

कोणी आयुष्याला प्रवास म्हणतो, कोणी संघर्ष, तर कोणी एक सुंदर स्वप्न परंतु या गीतात आयुष्याची तुलना जरतारी वखाशी केली आहे. ही उपमा अतिशय अर्थपूर्ण आहे जसे एक सुंदर वख अनेक धाग्यांनी विणले जाते, तसेच आयुष्य हे अनेक अनुभवांनी, नात्यांनी, भावना आणि घटनांनी तयार होते प्रत्येक धागा महत्त्वाचा असतो. काही धागे चमकदार असतात आनंदाचे, प्रेमाचे, यशाचे; तर काही धागे खडबडीत असतात दुःखाचे, अपयशाचे, संघर्षाचे. या दोन्ही प्रकारच्या धाग्यांशिवाय आयुष्याचे वा पूर्ण होत नाही.

जीवनाच्या याविणकामात प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे. विणकर जसा प्रत्येक धागा काळजीपूर्वक गुंफतो, तसा माणूसही आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून घडत जातो. सुख असो किंवा दुःख, प्रत्येक गोष्ट माणसाला काहीतरी शिकवते. संत तुकाराम महाराजांनी सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे असे सांगितले आहे. यामध्येही त्याच तत्त्वाचा प्रत्यय येतो. सुख थोडे असते, पण दुःख मोठे वाटते. मात्र हाच दःखाचा अनुभव माणसाला अधिक सक्षम बनवतो.

एक धागा सुखाचा ही ओळ आपल्याला एक महत्वाचा संदेश देते आयुष्यातील सुख हे क्षणभंगुर असते. ते क्षणिक असते, जसे पहाटेचा दवबिंद किंवा पावसाच्या सरीतील थेंब. पण दुःख मात्र दीर्घकाळ टिकणारे असते. मात्र याचा अर्थ असा नाही की जीवन दुःखमय आहे. उलट, दुःखामुळेच सुखाची किंमत कळते. भगवद्गीतेत सुखदःखे समे कृत्वा असा उपदेश करण्यात आला आहे. म्हणजेच सुख आणि दुःख दोन्ही समान मानणे आवश्यक आहे. अनुभवांचा काळ असतो आयुष्याचा सारांश या टप्प्यात उमगतो.

ग्रामीण जीवनात या येसी उघडा, जासी उघडा ही ओळ जीवनाच्या अंतिम सत्याची जाणीव करून देते. माणूस जन्गाला येतो तेव्हा काहीही घेऊन येत नाही आणि मृत्यूच्या वेळी काहीही घेऊन जात नाही. तरीही आयुष्यभर तो संपच्ची, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखांच्या मागे धावत राहतो संत ज्ञानेश्वरांनी जालीचा भोगासी असावे सादर असे सांगितले आहे म्हणजे जे येईल ते स्वीकारण्याची वृत्ती ठेवली पाहिजे.

मानवी आयुष्याचे तीन टप्पे-बालपण, तारुण्य आणि वार्धक्य – या गीतातून अप्रत्यक्षपणे समोर येतात. बालपण १०. हे निरागसतेचे प्रतीक आहे. कोणतीही चिंता नसलेले, मुक्त आणि आनंदी असे ते दिवस असतात. तारुण्य हा स्वप्नांचा काळ असतो. महत्त्वाकांक्षा, धडपड, यश आणि अपयश यांचा खेळ यात चालू असतो.

तर वार्धक्य हानाती हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. आई-वडील, मित्र, कुटुंब यांच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. सुखाचा खरा धागा या नात्यांमध्येच असतो जर ही नाती जपली, तर आयुष्य सुंदर बनते. मराठी साहित्यानेही जीवनाचे हेच तत्त्वज्ञान मांडले आहे. श्यामची आई मध्ये प्रेम आणि संस्कार दिसतात, मृत्युंजय मध्ये संघर्ष आणि आत्मवळ, तर ययाति मध्ये मानवी इच्छांचे परिणाम. या सर्व साहित्यकृती आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर माणूस दुःख अधिक लक्षात ठेवतो. कारण त्याचा मेंद धोक्याला जास्त महत्त्व देतो. पण सुख अनुभवण्यासाठी सजगता आवश्यक असते. आनंद हा बाहेर शोधण्याचा विषय नाही, तो मनातून निर्माण होतो. या सर्व विचारांचा सार असा की आयुष्य हे सुख आणि दुःख यांच्या संतुलनावर आधारित आहे. दुःख टाळता येत नाही, पण त्यातून शिकता येते.

सुख कायम टिकतनाही, पण त्याचा आनंद घेता येतो.
शेवटी, जीवनाच्या या जरतारी वखात कितीही दुःखाचे धागे असले, तरी जर आपण तो एक धागा सुखाचा जपला, तर आयुष्य सुंदर बनते म्हणूनच सुख शोधण्यापेक्षा ते जपणे महत्त्वाचे आहे. तत्त्वज्ञानाची अधिक जाणीव होते. शेतकरी पावसावर अवलंबून असतो कधी भरघोस उत्पन्न, तर कधी दुष्काळ, तरीही तो जीवन जगत राहतो त्याच्या आयुष्यातील सुख साधे असते कुटुंबासोबतचा वेळ , शेतातील पीक, आणि निसर्गाशी असलेले नाते. जिथे समाधान, तिथेच खरे धन ही मराठी म्हण येथे अगदी खरी ठरते.

आजच्या आधुनिक युगात्त मात्र परिस्थिती वेगळी आहे. तंत्रज्ञान , पैसा आणि सुविधा वाढल्या आहेत, पण समाधान कमी झाले आहे. माणूस अधिक धावत आहे, पण आनंद हरवत आहे. गोबाईल आणि इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे, पण माणसे दूर गेली आहेत. नात्यांमध्ये संवाद कमी झाला आहे.

 चंद्रकांत सरस्वती प्रकाश शेळके (तहसीलदार बीड)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

error: Content is protected !!