Homeमहाराष्ट्रसर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची नारायणगडाची परंपरा – महंत शिवाजी महाराज

सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची नारायणगडाची परंपरा – महंत शिवाजी महाराज

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : मराठवाड्यातील संतपरंपरेचा वारसा जपत सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन समाजहित साधण्याची श्रीक्षेत्र नारायणगडाची परंपरा आजही अखंडपणे सुरू असल्याचे प्रतिपादन महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांनी केले. गेवराई तालुक्यातील उमापूर येथे श्रीक्षेत्र नारायणगडाचा ७४ वा भव्य नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावल्याने परिसरात भक्तीचा महासागर उसळला होता.

या सप्ताहात महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नंदाच्या घराला’ या अभंगावर आधारित भव्य काल्याचे हरीकीर्तन पार पडले. या वेळी विविध क्षेत्रातील संत-महंत, मान्यवर आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार निलेश लंके, आमदार विजयसिंह पंडित यांसह अनेक मान्यवरांनी सप्ताहाला भेट देऊन भक्ती सोहळ्याचा आनंद घेतला. तसेच गोरक्षनाथ संस्थानचे महंत दत्ता महाराज गिरी, बदामराव पंडित, नामदेव महाराज शेकटेकर, संभाजी महाराज, नारायण महाराज यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना महंत शिवाजी महाराज म्हणाले की, संत नगदनारायण महाराजांच्या आशीर्वादात अपार शक्ती असून त्यांच्या सेवेमुळे भक्तांना आध्यात्मिक समाधान लाभते. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामस्थांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा सप्ताह अभूतपूर्व ठरला आहे. “काला” ही परंपरा एकत्र येऊन साजरी करण्याचा संदेश देत असून समाजात एकता आणि समरसता निर्माण करण्याचे कार्य करते. प्रत्येकाने आयुष्यात नम्रता आणि साधेपणा जपावा तसेच साधुसंतांच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगावे, असा संदेशही त्यांनी दिला.

तरुणांनी अशा भक्तीमय वातावरणात सहभागी होऊन अध्यात्माची ओढ निर्माण करावी, तसेच “रामकृष्ण हरी” या नामजपाचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व पुरुष भाविकांचा मोठा जनसागर उसळला होता.

या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी उमापूर व मारोतीचीवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या सहा महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. भाविकांसाठी भोजन, पाणी व इतर सोयींची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी सेवाभावाने सहभाग घेतल्याने सोहळा अधिक यशस्वी ठरला. याबद्दल महंत शिवाजी महाराज यांनी ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले.

दरम्यान, यंदाचा ७४ वा नारळी सप्ताह उमापूर येथे पार पडला असून, पुढील वर्षी २०२७ मध्ये श्रीक्षेत्र नारायणगड येथे ७५ वा अमृतमहोत्सवी नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा महंत शिवाजी महाराज यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!