Homeताज्या बातम्या“Elections Deferred Due “न्यायालयीन कारणांमुळे निवडणुका स्थगित; फडणवीसांची आयोगावर टीका म्हणाले‘निवडणुका पुढे...

“Elections Deferred Due “न्यायालयीन कारणांमुळे निवडणुका स्थगित; फडणवीसांची आयोगावर टीका म्हणाले‘निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत’”

Times of Maharashtra Desk: राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका तसेच 700 पेक्षा जास्त नगरसेवकपदांच्या निवडणुका न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून जोरात सुरू असलेला प्रचार अचानक थांबला असून कार्यकर्ते आणि उमेदवारांचा उत्साह कमी झाल्याचं दिसत आहे.ज्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, त्या ठिकाणांचा नवीन कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता त्या ठिकाणी मतदान 20 डिसेंबरला तर मतमोजणी 21 डिसेंबरला होईल.तर राज्यातील इतर सर्व ठिकाणांची मतदान प्रक्रिया मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरलाच होणार आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रातील मुद्दे:
1.जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 04/12/2025
2. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस 10/12/2025 (दुपारी 3:00 वाजेपर्यंत)
3. आवश्यकतेनुसार निवडणूक चिन्हे वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रकाशन 11/12/2025
4. मतदानाचा दिवस (आवश्यक असल्यास) 20/12/2025 (स. 7:30 ते सं. 5:30)
5. मतमोजणी व निकाल जाहीर 21/12/2025 (सकाळी 10:00 पासून)
6. राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख 23/12/2025

कोणत्या भागातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या?
अमरावती विभाग
बाळापूर
अंजनगाव सुर्जी
यवतमाळ
देऊळगाव राजा
वाशिम
कोकण विभाग
अंबरनाथ
छत्रपती संभाजीनगर विभाग
फुलंब्री
धर्माबाद
मुखेड
रेणापूर
वसमत
नागपूर विभाग
घुग्घूस
देवळी
नाशिक विभाग
देवळाली-प्रवरा
कोपरगाव
पाथर्डी
नेवासा
पुणे विभाग
बारामती
फुरसुंगी–उरळी देवाची
महाबळेश्वर
फलटण
मंगळवेढा
अनगर

फडणवीसांची निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका
राज्यातील काही नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कोणत्या कायद्यानुसार हा निर्णय घेतला आहे हे समजत नाही. माझ्या माहितीनुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत,” असे ते म्हणाले.फडणवीसांनी पुढे म्हटलं की, “उद्या निवडणुका असताना आज अचानक त्या पुढे ढकलणे चुकीचे आहे. अनेक उमेदवारांची प्रचारातील मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असला तरी अशा प्रकारचे निर्णय योग्य नाहीत.”
याबाबत लवकरच निवडणूक आयोगाला औपचारिक रिप्रेझेंटेशन देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

error: Content is protected !!