Homeक्राईमनागपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; मध्यरात्री फोटोग्राफरची लूट

नागपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; मध्यरात्री फोटोग्राफरची लूट

नागपुर-सावनेर (प्रतिनिधि राजू शिंदे) :  नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात मध्यरात्री फोटोग्राफरवर हल्ला करून त्याचा महागडा कॅमेरा किट लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना केलवद-रामपुरी रोडवर घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रणय हिवरकर (वय २५) आणि त्यांचा सहकारी कॅमेरा ऑपरेटर गौरव गायधने हे दोघे लग्न सोहळ्याचे शूटिंग पूर्ण करून सौसर तालुक्यातील बोरगाव येथून आपल्या गावी परतत होते. रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास, ते केलवद-रामपुरी रोडवर असताना फिकट काळ्या रंगाच्या टाटा अल्ट्रोज (एमपी २८ झेडए ६१३५) या कारमधून चार अज्ञात इसम उतरले आणि त्यांनी दोघांचा पाठलाग सुरू केला.

या दरम्यान, आरोपींनी मोटारसायकल अडवून त्यांना धमकावले. त्यापैकी एका आरोपीने चाकूचा धाक दाखवत प्रणय हिवरकर यांची बॅग हिसकावून घेतली आणि सर्वजण घटनास्थळावरून फरार झाले. या बॅगेमध्ये कॅनन कंपनीचे Canon R आणि Canon R6 असे महागडे कॅमेरा किट होते.

घटनेनंतर पीडितांनी केलवद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

error: Content is protected !!