Homeताज्या बातम्यामुरलीधर मोहोळ यांच्या कसब्यातील प्रचारात घुमली आरोळी...

मुरलीधर मोहोळ यांच्या कसब्यातील प्रचारात घुमली आरोळी…

मुरलीधर मोहोळ यांच्या कसब्यातील प्रचारात घुमली आरोळी…

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना दांडगा प्रतिसाद मिळत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ आणि कँटोन्मेंट मतदारसंघात सोमवारी एकत्रित रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, कसबा आणि कँटोन्मंट विधानसभा मतदार संघात काढण्यात आलेल्या रॅलीने धम्माल उडवून दिली. एक वेगळाच फील दिला. शहराच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या आणि सतत भोवताली गजबजाट असलेल्या या नागरिकांनी रॅलीच्या आगमनानं एक नवचैतन्य अनुभवल्याचं आज पाहायला मिळालं.

सारेच उत्साहानं गॅलरीत, दारात आणि गाडीजवळ येऊन हात उंचावून प्रोत्साहन देत होते, पाठिंबा दर्शवीत होते. अनेक तरुण-तरुणी आणि बंधू-भगिनी रस्त्यावर उतरून जोश वाढवित होत्या. काहींची भेटण्याची, तर काहींची सोबत सेल्फी काढून घेण्याची लगबग होती. हे सारं अनुभवताना हे केवळ मतदार नाहीत, तर ही आपली माणसं आहेत, यांच्यासाठी आपल्याला सातत्यानं जागरूक राहावं लागणार आहे, ही भावना प्रबळ होत होती. त्याच भावनेनं त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पाठीशी उभे राहण्याची विनंती केल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करुन आणि आशीर्वाद घेऊन प्रारंभ झालेली ही रॅली त्वष्टा कासार पवळे चौक, पुण्येश्वर भोईराज विठ्ठल मंदिर, शिंपी आळी, व्यवहार आळी, फडके हौद, आरसीएम कॉलेज, भारतमाता मंडळ, श्रमिकनगर, इंदिरानगर, भीमनगर, गोसावीपुरा, काळा वाडा, शनी-मारुती मंदिर, त्रिशुंडा गणपती, विक्रम मंडळ, औदुंबर मंडळ, दारूवाला पूल गणपती, श्रीयाळशेठ चौक, दीन बंधू चौक, स्वामीनारायण मंदिर, इंडियन बँक, निवडुंग्या विठोबा चौक, नाना चावडी चौक, डुल्या मारुती, दारूवाला पूल, सातववाडा, आंदेकर चौक, डोके तालीम, साखळीपीर तालीम, हिंदमाता चौक, पालखी विठोबा चौक, गोविंद हलवाई चौक, ढोर गल्ली, गोविंद हलवाई चौक, बोहरी आळी, सोन्या मारुती चौक, फडके हौद, तपकीर गल्ली या परिसरात मतदारांना भेटत गेली व रामेश्वर चौकात तिचा समारोप झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंडर-३० उद्योजकांचा भर उत्पादन विकासावर; उभारलेल्या निधीपैकी ५३% रक्कम विस्तारासाठी खर्च

0
नवी दिल्ली : भारतातील ३० वर्षांखालील (U30) युवा उद्योजक केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभारण्यातच आघाडीवर नसून, त्या निधीचा सुयोग्य वापर करून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यावर...

तीव्र भूकंपाच्या धक्क्यातही जापानच्या उंच इमारती सुरक्षित कशा राहतात? जाणून घ्या तंत्रज्ञान

0
जापान.. म्हंटलं स्वच्छ आणि प्रत्येक गोष्टीत एकदम परफेक्ट असलेला देश.. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही जापानी फुटबॉल चाहत्यांच्या कृतीने मनं जिंकली. सामना संपल्यावर स्टेडियममधील कचरा...

गुजरातमध्ये १.८९ कोटी मुलांना मिळणार ‘हेल्थ पासपोर्ट’; जन्मापासून १८ वर्षांपर्यंतचा आरोग्य इतिहास एका दस्तऐवजात

0
अहमदाबाद : बालकांच्या आरोग्याची सातत्याने नोंद ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने राज्यभर 'हेल्थ पासपोर्ट' ही अभिनव योजना सुरू केली...

राज्यात पावसाचं धुमशान; ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, 24 तासांसाठी रेड अलर्ट

0
मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीये. या पावसाचा संपूर्ण शहराच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतोय. मुंबईसह ठाणे,...

व्हॉट्सॲपच्या ‘युजरनेम’ फीचरवर केंद्र सरकारची नजर; फसवणूक व तोतयागिरीच्या धोक्यामुळे आढावा

0
नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप लवकरच वापरकर्त्यांसाठी 'युजरनेम' (Username) हे नवे फीचर आणणार आहे. या सुविधेमुळे मोबाईल क्रमांक न देता केवळ युजरनेमच्या...

error: Content is protected !!