Homeताज्या बातम्याProfessor Recruitment : प्राध्यापक भरतीत ७५:२५ सूत्र नको; अभाविप, राज्य सरकार आमने-...

Professor Recruitment : प्राध्यापक भरतीत ७५:२५ सूत्र नको; अभाविप, राज्य सरकार आमने- सामने

Times of Maharashtra Desk, Pune : महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये रखडलेल्या प्राध्यापक भरतीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. प्राध्यापक भरती पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असला तरी, यातील एका मुद्द्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र आक्षेप घेतला आहे. अभाविपने सहायक प्राध्यापक भरतीसाठी शासनाने ठेवलेले ७५:२५ चे सूत्र त्वरित रद्द करून विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेले ५०:५० चे सूत्र अवलंबावे अशी मागणी केली आहे.

अभाविपचा आक्षेप

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, सहायक प्राध्यापक पदासाठी निवड होण्यासाठी ७५:२५ हे सूत्र ठेवण्यात आले आहे. या ७५ गुणांमध्ये शैक्षणिक पात्रता, शिकवण्याचा अनुभव आणि संशोधन कार्य यांचा समावेश आहे. यात ७५ पैकी किमान ५० गुण मिळाले तरच ती व्यक्ती मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहे. या निर्णयानुसार केवळ सेट/नेट उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीला शिकवण्याचा अनुभव आणि संशोधन कार्याचे गुण मिळणे शक्य नाही. या अटींमुळे सेट/नेट किंवा पीएचडी झालेले आणि विशेषतः ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेले बहुसंख्य उमेदवार ५० गुणांची अट पूर्ण करू शकणार नाहीत. हा निर्णय नवीन सेट/नेट उत्तीर्ण झालेल्या किंवा पीएचडी झालेल्या उमेदवारांवर अन्याय करणारा असून, सहायक प्राध्यापक पदासाठीचे ५०:५० हेच नैसर्गिक सूत्र वापरावे असे अभाविपचे म्हणणे आहे.

अभाविपच्या प्रमुख मागण्या

सहायक प्राध्यापक भरतीसाठी ७५:२५ चे सूत्र न अवलंबता युजीसीने मान्यता दिलेले ५०:५० चे सूत्र त्वरित लागू करावे. शैक्षणिक पात्रतेतील दुजाभाव करणारी मानांकन पद्धती बदलण्यात यावी. सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक यांच्या भरतीसाठी ७५:२५ सूत्र योग्य असले तरी, सहायक प्राध्यापक पदाच्या संदर्भातील या अटीवर योग्य पुनर्विचार करून निर्णयात बदल करण्यात यावा. या अभाविपच्या प्रमुख मागण्या आहेत.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अथर्व कुलकर्णी यांनी शासनाने यावर योग्य निर्णय घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही याची खात्री करावी आणि केवळ या मुद्द्यावर भरती प्रक्रिया रखडणार नाही याची दक्षता घ्यावी असे मत व्यक्त केले आहे. अभाविपची मुख्य भूमिका प्राध्यापक भरतीची कार्यवाही आणि अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी हीच असल्याची देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

#MaharashtraNews #HigherEducation #ProfessorRecruitment #AssistantProfessor #UGCGuidelines #ABVP #ABVPMaharashtra #EducationPolicy #AcademicJobs #TransparentRecruitment #PuneUpdates #TimesOfMaharashtra #StudentsVoice #GovernmentDecision #75vs50Formula #ABVPDemands #MaharashtraUniversities

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!