Homeताज्या बातम्याPune City News : महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर.. धंगेकरांचे मोहोळ यांच्यावर गंभीर...

Pune City News : महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर.. धंगेकरांचे मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप

Times of Maharashtra Desk, Pune: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसिंगच्या जमीन खरेदीवरून सुरू झालेला वाद शांत झाल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोहोळ यांच्या गुंडांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. मागील काही दिवसांपूर्वी जैन बोर्डिंग हाऊसिंगच्या जमीन खरेदी प्रकरणावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना महायुतीमध्ये वाद नको, अशा सूचना दिल्या होत्या. पुढे जैन बोर्डिंग हाऊसिंगचा व्यवहार रद्द झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करणे थांबवले होते. आमचं आता ठरलं आहे, मी नाव घेणार नाही, असे म्हणत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करणे बंद केले होते. मात्र, काल धंगेकर हे मुंबई मधून पुण्यात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नेमके आरोप काय आहेत?
मुरलीधर मोहोळ यांनी भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या चिटणीसपदी नेमणुक केलेल्या रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवत त्याच्या 30 ते 40 साथीदारांसह पुण्यातील मेगा सिटी वस्तीमध्ये घुसून समीर चव्हाण, सनी चव्हाण यांसह वस्तीतील महिलांवर हल्ला केला आहे. रफिक शेख हा मुरलीधर मोहोळ यांचा गुंड आहे. असे आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केले आहेत. सुसंस्कृतपणा हा फक्त पत्रकारांसोबत बोलताना दाखवला जातो, गुन्हेगारीची पाळेमुळे इथेच आहेत, असेही ते म्हणाले.

मागील काही दिवसांपूर्वी जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी महायुतीमध्ये आरोपांचा चांगलाच कलगितुरा रंगला होता. परंतु आता धंगेकरांच्या नवीन आरोपांमुळे महायुटीमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!