Homeक्राईमपुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच...

पुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच मनपाच्या बांधकाम विभागात खळबळ…

Times Of Maharashtra Desk पुणे : अनधिकृत बांधकामाविरोधात दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी वेगळ्याच विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेत नागरिकांना गोंधळात टाकण्याचा प्रकार पुणे महानगरपालिका मध्ये उघड झाला असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रिपब्लिकन सेनेनं अधिकाऱ्यांना घेरलं…
रिपब्लिकन सेनेचे सरचिटणीस दत्ता शेंडगे यांनी वडगाव बुद्रुक परिसरातील सर्व्हे क्रमांक ४५, ४१, ४४, ४३ येथील अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र झोन क्रमांक २ चे उप अभियंता राजेश खाडे यांनी दिलेल्या उत्तरात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन परिपत्रकाचा आधार घेत तक्रारीवर कारवाई टाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

सदर शासन निर्णय हा प्रत्यक्षात शिक्षण विभागाशी संबंधित असून शिक्षक नियुक्ती व शैक्षणिक संस्थांमधील बाबींशी निगडीत आहे. तरीही बांधकाम विभागाने त्याचा वापर अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात केल्याने हा प्रकार “कायद्याचा चुकीचा वापर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे शहराध्यक्ष अजय भालशंकर यांनी कार्यकारी अभियंता नेवाळी यांना थेट जाब विचारत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिक्षण विभागाचा जीआर वापरून बांधकाम प्रकरण दडपण्याचा प्रयत्न का केला जातोय? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

पत्रामध्ये “त्रयस्थ व्यक्तींच्या तक्रारी विचारात घेऊ नयेत” असा उल्लेख करत तक्रारदाराकडून वैयक्तिक हितसंबंध विचारण्यात आले आहेत. मात्र, कायद्यानुसार कोणताही नागरिक सार्वजनिक हितासाठी अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार करू शकतो, हे स्पष्ट असतानाही अशा प्रकारे अडथळे निर्माण केल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे.

या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत:

शिक्षण विभागाच्या जीआरचा वापर बांधकाम प्रकरणात का करण्यात आला?
अनधिकृत बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी हा नवा मार्ग आहे का?
नागरिकांच्या तक्रारी दाबण्यासाठी अधिकारी चुकीचा कायदेशीर आधार घेत आहेत का?

दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा, “कायद्याचे पालन करणारेच जर कायद्याचा गैरवापर करत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुठे शोधायचा?” असा सवाल उपस्थित होत आहे.

भाग 1 क्रमशः

(पुढील भागात: या प्रकरणात कायदेशीर कारवाईचे पर्याय आणि नागरिक काय करू शकतात याचा सविस्तर आढावा)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

error: Content is protected !!