Homeमहाराष्ट्ररावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी १३५ सूर्यनमस्कार घालून बाबासाहेबांना मानवंदना अर्पण केली.

हे योग शिबिर पतंजली योग समिती पालम, श्री नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच सार्वजनिक भीम जन्मोत्सव समिती रावराजूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन आणि शंखनादाने करण्यात आली.

यानंतर सहभागी नागरिकांना सूक्ष्म व्यायाम, योगिक जॉगिंग, विविध योगासने तसेच सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देण्यात आले.

या शिबिरात योग शिक्षक प्रकाश डिकळे, व्यंकट शिंदे, शिवाजीराव चौधरी, शाम कवटकवार, विष्णुदास शिंदे आणि धनंजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष सतीश गोबाडे, याकुब सय्यद, इर्शाद फारुकी, गोपाळ खंदारे, मिथुन गोबाडे, गोविंदराव शिंदे, विशाल साळवे, उन्मेष साळवे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याचप्रमाणे श्री नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालय रावराजूर येथे मुख्याध्यापक पवार, शिक्षक बिरादार, राठोड, काळे, चलवाड आदींनी भारतमाता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक प्रकाश डिकळे यांनी केले. योग शिबिरात शिवाजी चौधरी, शाम कवटकवार व प्रकाश डिकळे यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आयोजक, पदाधिकारी व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!