Homeमहाराष्ट्रशिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत नव्या नेतृत्वाची निवड ; विकासकामांना मिळणार वेग-विकासावर भर

शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत नव्या नेतृत्वाची निवड ; विकासकामांना मिळणार वेग-विकासावर भर

धनंजय देवंग्रे ( लातूर शहर प्रतिनिधी ) : शिरूर अनंतपाळ येथील नगरपंचायतीमध्ये विविध विषय समित्या व स्थायी समितीच्या सभापती पदासाठी आज दुपारी 12.30 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत सर्व समित्यांच्या सभापती व सदस्यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. निवड प्रक्रिया शांततेत आणि नियमानुसार पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले.

नगरपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, विकासकामांना गती आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर भर देण्याच्या दृष्टीने या समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांवर शहर विकासाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विषय समित्यांचे सभापती पुढीलप्रमाणे :

सार्वजनिक बांधकाम समिती – श्री. बरगे ओमप्रकाश मारोती, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती – श्री. काळे अनंत जनार्धन, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती – श्री. मुदाळे वीरभद्र हणमंत, नियोजन व विकास समिती – सौ. संभाळे श्रीदवी माधव, महिला व बालकल्याण समिती – सौ. शिंदे शामल दत्ता, उपसभापती – सौ. खरटमोल कुसुम माधव, स्थायी समिती सभापती श्रीमती चंद्रकला शिवाजी शिवणे, या निवडीनंतर नगरपंचायतीच्या कारभाराला नवे नेतृत्व लाभले आहे. विशेषतः पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सुविधा, रस्ते विकास आणि महिला-बालकल्याण योजनांवर भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सभेत उपस्थित नगरसेवकांनी शहरातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण वेगाने करण्यासाठी समित्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

स्थानिक नागरिकांनीही नव्याने निवडलेल्या पदाधिकाऱ्यांकडून विकासकामांना गती मिळेल, शहर स्वच्छ व सुबक होईल आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही समिती रचना महत्त्वाची ठरणार असून आगामी काळात नगरपंचायतीच्या कामकाजाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

error: Content is protected !!