Homeताज्या बातम्याठाण्यातील शासकीय अधिकाऱ्यांना मागितली खंडणी ; ठाणे शहर पोलीस खंडणी विरोधी पथकाने...

ठाण्यातील शासकीय अधिकाऱ्यांना मागितली खंडणी ; ठाणे शहर पोलीस खंडणी विरोधी पथकाने कारवाई करून 3 आरोपी केले अटक…

ठाण्यातील शासकीय अधिकाऱ्यांना मागितली खंडणी ; ठाणे शहर पोलीस खंडणी विरोधी पथकाने कारवाई करून 3 आरोपी केले अटक…

ठाणे : माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीचा गैरवापर करून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणास बसून शासकीय अधिकाऱ्याकडे दोन लाख रूपये खंडणीची मागणी करणाऱ्या सुभाष पाटील (४०), समषाद पठाण (४८), संतोष हिरे (४४) अशा तीन जणांच्या टोळीस ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

त्या त्रिकुटाला येत्या ७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून अशाप्रकारे ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर या परिसरातील नागरीकांकडून कोणी ब्लॅकमेलींग करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्वरीत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले आहे.

अटकेतील त्रिकुटापैकी नाशिक येथील पाटील हा माहिती अधिकारी कार्यकर्ता आहे. तसेच अंबरनाथ येथे पठाण आणि नाशिकमधील हिरे हे दोघे साप्ताहिकाचे पत्रकार आहेत. त्यांनी कळवा येथील सह दुय्यम निबंधक, वर्ग २ चे अधिकारी तथा तक्रारदार जयंत दामोदर जोपळे यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रात छापू बदनामी करू, तसेच तक्रारदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी याकरीता संबंधीत वरिष्ठ कार्यालयात तक्रारी अर्ज करू अशी धमकी दिली. तसेच तक्रार न करण्यासाठी त्यांच्याकडे २ लाख रूपये खंडणीची मागणी केली. परंतू तक्रारदारांनी त्यास नकार दिल्याने यातील पठाण व हिरे हे खंडणीची रक्कम देण्यासाठी दबाव यावा याकरीता त्यांच्याविरोधात बातम्या छापून मुंबई,आझाद मैदान येथे वेळोवेळी उपोषणास बसुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी करीत होते. 

२ नोव्हेंबर २०२३ रोजी जोपळे यांनी खंडणी विरोधी पथक कार्यालयात जाऊन तक्रार केली. त्यानंतर तक्रारदारांकडे मागणी केलेली खंडणीची रक्कम स्वीकारण्याकरीता कळवा, सरोवर हॉटेल येथे हिरे याला ५० हजार तर पठाण याला एक लाख रुपये घेताना वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात जोपळे यांच्या तक्रारीनुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली. तर पाटील याला नाशिक येथून अटक केली. या तिघांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल नसून त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक या परिसरात अशाप्रकारे खंडणीची मागणी केली असल्याची शक्यता वर्तवित त्यादृष्टीने पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!