Homeताज्या बातम्याजागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्यंकटापूर येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्यंकटापूर येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

सिरोंचा (प्रतिनिधी जाबिर खान) : व्यंकटापूर, दि. ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथे पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोउपनि राजु एस. गड्डापोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सार्वजनिक वाचनालय परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी, एसआरपीएफचे अधिकारी व जवान, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला.

यानंतर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्लास्टिकमुक्त व स्वच्छ गाव निर्मितीचा संदेश देत नागरिकांनी श्रमदान केले. पर्यावरणविषयक घोषवाक्ये आणि संदेश असलेले फलक हातात घेऊन जनजागृती रॅलीही काढण्यात आली. यावेळी वृक्षसंवर्धन, जलसंधारण आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

पोउपनि राजु एस. गड्डापोड यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. तसेच “एक अधिकारी – एक वृक्ष” ही मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

error: Content is protected !!