Homeताज्या बातम्यावडगावशेरी: बेकायदेशीर होर्डिंग प्रकरण; होर्डिंग हटवले, पण धोकादायक पोल अजूनही उभा; अपघाताची...

वडगावशेरी: बेकायदेशीर होर्डिंग प्रकरण; होर्डिंग हटवले, पण धोकादायक पोल अजूनही उभा; अपघाताची भीती कायम…

Times of Maharashtra Desk, Pune: वडगावशेरी परिसरातील बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी टाईम्स ऑफ महाराष्ट्र ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अखेर महापालिकेने संबंधित होर्डिंग हटवण्याची कारवाई केली असली, तरी प्रत्यक्षात होर्डिंगचा

Times of Maharashtra Desk, Pune: वडगावशेरी परिसरातील बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी टाईम्स ऑफ महाराष्ट्र ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अखेर महापालिकेने संबंधित होर्डिंग हटवण्याची कारवाई केली असली, तरी प्रत्यक्षात होर्डिंगचा एक मोठा लोखंडी पोल अद्यापही जागेवर तसाच उभा असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा पोल कधीही कोसळू शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सर्वे क्र. 46/6, मौजे वडगावशेरी येथील 40×20 आकाराचे बेकायदेशीर होर्डिंग मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते. माजी नगरसेवकांनी 15 एप्रिल 2025 रोजी महापालिकेकडे तक्रार करूनही 120 दिवस कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. अखेर टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमी नंतर होर्डिंग हटवण्यात आले, मात्र त्याचा मुख्य आधारस्तंभ म्हणजेच पोल अर्धवट अवस्थेत तिथेच सोडण्यात आल्याचे आता समोर आले आहे.

हा पोल गंजलेला असून जोरदार वारा, पावसाळी परिस्थिती किंवा तांत्रिक दुर्लक्षामुळे तो कोसळल्यास रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालक, पादचारी तसेच आसपासच्या नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे याच परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांचीही वर्दळ असते.

याआधी सदर जागा महापालिकेने अतिक्रमण म्हणून कारवाई करून रिकामी केली होती. त्याच ठिकाणी उभारलेल्या बेकायदेशीर होर्डिंगवर मोठ्या संघर्षानंतर कारवाई झाली असताना, आता अर्धवट पोल सोडून देणे म्हणजे महापालिकेचा निष्काळजीपणा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या परिसरापासून काही अंतरावरच 9 BRD एअर स्टेशन असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही हा मुद्दा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. अशा ठिकाणी कोणतेही अनधिकृत किंवा धोकादायक स्ट्रक्चर राहणे हे नियमबाह्य आणि धोकादायक असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

महापालिकेने तातडीने उर्वरित पोल हटवून संभाव्य अपघात टाळावेत, अन्यथा भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

वडगावशेरीतील हे प्रकरण पुन्हा एकदा महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून, आता तरी प्रशासन वेळेत आणि पूर्ण स्वरूपात कारवाई करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अद्यापही जागेवर तसाच उभा असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा पोल कधीही कोसळू शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

error: Content is protected !!