Homeताज्या बातम्यानवा भारत ओळखण्याची गरज; खोट्या कथ्यांविरुद्ध सजग राहण्याचे डॉ. उदय निरगुडकर यांचे...

नवा भारत ओळखण्याची गरज; खोट्या कथ्यांविरुद्ध सजग राहण्याचे डॉ. उदय निरगुडकर यांचे आवाहन…

Times of Maharashtra Desk, Pune: भारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे अनेक देश विविध प्रकारे भारताविरुद्ध षड्यंत्रे रचत आहेत. नवा भारत खूप काही नवे, सकारात्मक आणि चांगले घडवत आहे. लक्षणीय प्रगती करत आहे. हा नवा भारत भारतीयांनी समजून घ्यायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली.

‘कौशिक आश्रम’ आणि ‘अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आयोजित ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमाले’त डॉ. निरगुडकर बोलत होते. ‘अस्थिरता, फुटीरतावाद आणि भारत’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.

नव्या भारतात जे काही चांगले घडत आहे, ते लोकांसमोर येऊ नये आणि देशाचे नकारात्मक चित्र लोकांसमोर उभे रहावे, असे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. अशा खोट्या कथ्यांवर (नॅरेटिव) विश्वास न ठेवता त्यांना आपण पराभूत करू या, असे आवाहन डॉ. निरगुडकर यांनी केले.

व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प डॉ. संजय उपाध्ये यांनी गुंफले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा मानवतेला शांती मिळवून देणारा सद्गुण आणि विचार भारताकडे आहे. हिंदू सनातन चिंतनातूनच जगाला शांती मिळू शकते. त्यासाठी साऱ्या भारतवासीयांना एकत्र यावे लागेल. प्रत्येकाला चांगल्या कार्यात सक्रिय व्हावे लागेल, व्यक्त व्हावे लागेल, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा लागेल. राष्ट्राच्या उद्धारासाठी काम करावे लागेल, असे डॉ. उपाध्ये म्हणाले. जेष्ठ कार्यकर्ते दिवाकर पांडे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

श्रेया रासनेचा विशेष सन्मान

व्याख्यानमालेत श्रेया रासने हिचा मानपत्र आणि अकरा हजार रुपये देऊन विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेत श्रेयाने लिहिलेल्या ‘प्रत्ययलोपे प्रत्ययलक्षणम्’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचे तसेच दिग्दर्शन आणि लेखन यासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले. श्रेया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वेदांत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिला नाट्यकलेची विशेष आवड आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!