Homeताज्या बातम्याओला-उबरच्या पलीकडे: सहकार टॅक्सीने स्वावलंबी वाहतुक शक्य होणार?

ओला-उबरच्या पलीकडे: सहकार टॅक्सीने स्वावलंबी वाहतुक शक्य होणार?

लेखक: डॉ. धनंजय मुंडे
(Faculty Member ICM, Pune)

२१ व्या शतकातील भारताची गतिशील व्यवस्था सध्या संक्रमणाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यातून जात आहे. भारताची सुमारे ६५% तरुणांची दैनंदिन व्यवस्था ही प्रामुख्याने वाहन व्यवस्थेशी निगडित आहे. त्याहेतूने जलद गतीने या क्षेत्रामध्ये आधुनिक बदल आपल्याला दिसून येत आहेत, जेणेकरून प्रवासी वर्गाच्या समस्या कमी होतील.

वाहनांच्या झपाट्याने होणाऱ्या प्रसारामुळे देशातील वाहतूक क्षेत्र नव्या दिशेने पुढे सरकत असले, तरी डिजिटल राईड-हेलिंग मॉडेलमधील (मोबाईल अॅपवर चालणारी टॅक्सी सेवा) वाढत्या मर्यादा सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. मोठ्या प्रमाणावर भारतात विस्तार झालेल्या ओला, उबर आणि समकक्ष वाहतूक सेवा पुरवठादारांनी शहरी वाहतूक व्यवस्थेला निश्चितच नवी दिशा दिली आहे. परंतु वाढती मागणी, मोठी लोकसंख्या आणि सेवा-मक्तेदारीचा कल वाढत गेल्याने त्यातील त्रुटी आता स्पष्टपणे प्रवासी आणि वाहतूक चालकांनाही जाणवू लागल्या आहेत. जसे की, राईड रद्द करणे, अनपेक्षित सर्ज प्राइसिंग आकारणे, रात्रीची अस्थिर उपलब्धता आणि महानगरांबाहेरील कमी स्पर्धेमुळे सेवा असमानतेत वाढ झाली आहे.

२०२५ मधील आकडेवारी असे चित्र दर्शवते की टॅक्सी ऍप सेवांच्या सुमारे ८०% वापरकर्त्यांनी राईड रद्द झाल्याची तक्रार केली. २०२३ मधील नोंदी तर यापेक्षा अत्यंत चिंताजनक आहेत. अशा स्थितीत, वाहतूक क्षेत्रात अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि भारताच्या वास्तवाशी सुसंगत असा पर्याय समोर येणे अपरिहार्य ठरते.

त्याहेतूने भारत सरकार अंतर्गत सहकार मंत्रालय एक काळानुरुप, व्यवस्थेतील सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन एक सर्वव्यापी असा वाहतूक क्षेत्रासाठी अविष्कार घेऊन येत आहे. त्याचे नाव आहे ‘भारत टॅक्सी/सहकार टॅक्सी’. भारताला आधुनिक, विकसित, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रवासामध्ये ही सेवा नक्कीच आशेचा किरण दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सहकार टॅक्सी / भारत टॅक्सी सहकारी तत्त्वांवर आधारित असणारे हे एक वाहतूक व्यवस्थेला स्थानिक गतिशीलता देणारी महत्त्वपूर्ण सेवा म्हणून उदयास येत आहे. ही सेवा केवळ वाहतूक सुविधापर्यंत मर्यादित नसून ती चालकांचे सक्षमीकरण करते, पारदर्शक किंमत आकारते, शाश्वतता आणि समुदायकेंद्रित सेवा यांचा समन्वय साधत भारतीय गतिशीलतेला नवा आयाम देते.

सहकार टॅक्सी / भारत टॅक्सी ची प्रमुख वैशिष्ट्ये

  1. बहुपर्यायी प्रवास (सायकल-ऑटो-कॅब)

2. चालकांना संपूर्ण भाडे

3. २४-७ विश्वासार्हता

4. हरित, शाश्वत आणि सर्वसमावेशक गतिशीलता

5. सर्जविरहित व पारदर्शक किंमत

6. मेड फॉर इंडिया वाहतूक सेवा

7. प्रशिक्षित व प्रमाणित चालक

आता या सातही मुद्द्यांबद्दल सविस्तर माहिती घेऊ…

१. २४*७ विश्वासार्हता

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात आहे तो त्यांच्या मेहनतीमुळे, कामाच्या निरंतरतेमुळे. या तरुणांना शहरांमध्ये दिवस-रात्र आळीपाळीने काम करावे लागते. त्यानुसार आपत्कालीन परिस्थिती, रात्रीची नोकरी, विमानतळ प्रवास किंवा औद्योगिक परिसरातील शिफ्ट बदल या सर्वांसाठी निरंतर अशी २४७ स्थिर सेवा अत्यावश्यक असते. त्याहेतूने सध्या अस्तित्वात असणारे नावाजलेले पर्याय मोठ्या प्रमाणावर प्रवासी दर, कमिशन आणि मागणीवर आधारित पुरवठा, रात्रीच्या कमी सेवा या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच सहकार टॅक्सी / भारत टॅक्सीसारख्या मोबाईल ऍपवर आधारित आधुनिक वाहतूक सेवेद्वारे सर्वसामान्य लोकांनी, सर्वसामान्य लोकांसाठी परवडणाऱ्या दरात २४७ टॅक्सी सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वेळेनुसार व गरजेनुसार चालणारी ही सेवा ‘सहकार से समृद्धी’ या तत्त्वावर आधारित असल्यास चालकांचे सक्षमीकरण होईल आणि वाहतूक व्यवस्था अधिक आत्मनिर्भर व विकसित होईल.

२. मेड फॉर इंडिया (शहरी व निमशहरी भागांसाठी अनुरूप वाहतूक सेवा)

भारताची सामाजिक-आर्थिक आणि भौगोलिक विविधता पाहता, एकसंध आणि जागतिक पातळीवरील वाहतूक मॉडेल देशभर तंतोतंत लागू होणे अवघड आहे. महानगरांबाहेरील शहरांमध्ये वाहतुकीची मागणी विखुरलेली असते, इंटरनेट कनेक्टिव्हिटी अनेक ठिकाणी मर्यादित असते आणि स्थानिक पातळीवरील वाहतूक गरजा वेगळ्या स्वरूपाच्या असतात. अशा परिस्थितीत सहकार टॅक्सी हे भारतीय वास्तवाला अनुरूप असे व्यवहार्य समाधान ठरू शकते. स्थानिक भाषेतील ऍप इंटरफेस, ऑफलाइन बुकिंग केंद्रांची सुविधा, विविध प्रकारची वाहने आणि कमी इंटरनेट गतीतही कार्यरत राहणारे ऍप यांमुळे ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुलभ ठरते. परिणामी पर्यटन स्थळे, औद्योगिक परिसर तसेच ग्रामीण-शहरी जोडणाऱ्या मार्गावरही सहज, सुरक्षित आणि परवडणारी वाहतूक सेवा उपलब्ध होऊ शकते.

३. प्रशिक्षित व प्रमाणित चालक (सुरक्षिततेचा कणा)

भारतामध्ये अलीकडच्या काळात वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष आणि दिरंगाईसारख्या गंभीर समस्या सातत्याने समोर येत आहेत. प्रवासी पूर्ण विश्वासाने प्रवास करतात, तरीही दुर्दैवी घटना आजूबाजूला घडताना दिसतात. सुरक्षित आणि निर्भय प्रवास हा प्रत्येक प्रवाशाचा मूलभूत हक्क आहे. हे लक्षात घेऊन सहकार टॅक्सी सेवेमध्ये केवळ प्रशिक्षित व प्रमाणित चालकांनाच सहभागी करून घेतले जाते. यासाठी चालकांची बहु-स्तरीय पडताळणी, पोलीस सत्यापन, प्रवासी-वर्तन प्रशिक्षण आणि बचावात्मक वाहनचालक शिक्षण सक्तीने राबवले जाते. यासोबतच पॅनिक बटण, जीपीएस ट्रॅकिंग यांसारखी आधुनिक सुरक्षा साधने वापरण्यात येतात. तसेच महिला चालक गटांना आणि समुदाय-आधारित ताफ्यांना प्रोत्साहन देण्यात येते, ज्यामुळे प्रवाशांचा विश्वास वाढतो आणि सुरक्षिततेची पातळी अधिक उंचावते.

४. सर्जविरहित व पारदर्शक किंमत (ग्राहकांसाठी न्याय्य सेवा)

सध्या उपलब्ध असलेल्या अनेक अॅप-आधारित वाहतूक सेवांमध्ये सर्ज प्राइसिंग (मागणी-पुरवठ्यानुसार भाडेवाढ) मुळे प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस, सण-उत्सव, गर्दी किंवा पीक अवर्स यांसारख्या कोणत्याही प्रसंगी भाडे मनमानी पद्धतीने वाढवले जाते. याउलट, सहकार टॅक्सी सेवा निश्चित रेटकार्ड, सार्वजनिकरित्या जाहीर केलेले शुल्क आणि सर्जविरहित भाडे मॉडेल स्वीकारते. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा खर्च आधीच स्पष्टपणे समजतो आणि सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण लक्षणीयरीत्या कमी होतो.

५. चालकांना संपूर्ण भाडे (आर्थिक स्थैर्याचा पाया)

उबर, ओला तसेच इतर खासगी वाहतूक प्लॅटफॉर्मवर चालकांना सरासरी २०-३० टक्के कमिशन द्यावे लागते, ज्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न कमी होते आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होते. याच्या उलट, सहकार टॅक्सी मॉडेलमध्ये प्रवाशांकडून मिळणारे संपूर्ण भाडे थेट चालकांकडे जाते. केवळ अत्यल्प तांत्रिक शुल्क वजा केले जाते. परिणामी चालकांची आर्थिक सुरक्षितता वाढते, वाहन देखभालीकडे अधिक लक्ष देता येते, सेवागुणवत्तेत गुंतवणूक होते आणि प्लॅटफॉर्मबद्दल चालकांची निष्ठा दृढ होते. यासोबतच ही सेवा मक्तेदारीविरुद्ध स्थानिक पातळीवर स्वस्थ आणि न्याय्य स्पर्धा उभी करण्यासही हातभार लावते.

६. बहुपर्यायी प्रवास (एका ऍपमध्ये सायकल-ऑटो-कॅब)

भारतीय वाहतूक व्यवस्थेत मल्टी-मॉडेल प्रवासाला विशेष महत्त्व आहे. दुचाकी, ऑटो, कॅब, ई-रिक्षा असे विविध पर्याय वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये अधिक उपयुक्त ठरतात. सहकार टॅक्सी सेवेमध्ये प्रवासी एका क्लिकमध्ये वाहनाचा प्रकार बदलू शकतो, अंदाजित प्रवास वेळ व भाडे त्वरित पाहू शकतो आणि स्वतःच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ, खर्च आणि वाहनांची उपलब्धता यांचे अधिक प्रभावी आणि सोयीस्कर व्यवस्थापन शक्य होते.

७. हरित, शाश्वत आणि सर्वसमावेशक गतिशीलत

ई-वाहनांच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणीय जबाबदारी आणि आर्थिक कार्यक्षमता यांचा समतोल साधता येतो. सहकार टॅक्सी मॉडेल ई-व्हींचा स्वीकार वेगाने वाढवते, सीएनजी व कमी उत्सर्जन असलेल्या ताफ्यांना प्रोत्साहन देते आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देते. यासोबतच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कमी उत्पन्न गटांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. महिला व स्वयंसहाय्यता गटांना वाहन-स्वामित्वाच्या संधी देऊन स्थानिक रोजगारनिर्मितीलाही हातभार लावला जातो. हरित तंत्रज्ञान आणि सामाजिक समावेशन यांचा समन्वय साधणारे हे मॉडेल भविष्यासाठी अधिक उपयुक्त, मानवी आणि टिकाऊ ठरते.

 

भारताच्या वाढत्या लोकसंख्या, शहरीकरण आणि ई-वाहनांच्या वाढत्या स्वीकाराच्या पार्श्वभूमीवर देशाला लोककेंद्रित वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. ओला-उबरसारख्या प्लॅटफॉर्ममध्ये मक्तेदारी, सर्ज प्राइसिंग आणि अनिश्चित उपलब्धता या समस्या आहेत, तर सहकार टॅक्सी / भारत टॅक्सी न्याय्य, सर्जविरहित किंमत, चालकांचे आर्थिक सक्षमीकरण आणि २४*७ सेवा पुरवते. ई-व्ही आधारित शाश्वतता आणि सर्वसमावेशक गतिशीलता यांचा समन्वय साधणारे हे मॉडेल भारताला आत्मनिर्भर आणि टिकाऊ प्रवासाचा मार्ग दाखवते.

आपल्या अनमोल प्रतिक्रिया खालील संपर्क क्रमांक व Mail ID वर लेखकांपर्यंत जरूर पोहोचवा.
( प्रतिक्रियांसाठी, 9623574869 | mdhanu07@gmail.com)

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...
error: Content is protected !!