Homeआरोग्यविहिरीत तोल जाऊन पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; गेवराई तालुक्यातील घटना

विहिरीत तोल जाऊन पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; गेवराई तालुक्यातील घटना

गेवराई, (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, विहिरीत तोल जाऊन पडल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना तालुक्यातील सुशी वडगाव येथे शनिवारी (दुपारी सुमारे ३ वाजता) घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संकेत कैलास काळे (वय २५) हा तरुण शेती व्यवसाय करत होता. त्याच्या मालकीच्या शेतामध्ये सध्या विहीर खोदण्याचे काम सुरू होते. शनिवारी दुपारी तो विहिरीचे काम कितपत झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी शेतात गेला होता.

यावेळी विहिरीच्या कडेला उभा असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट विहिरीत कोसळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. विहिरीचे खोदकाम करणाऱ्या कामगारांनी तत्काळ ही माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेतील संकेत काळे याला तातडीने उपचारासाठी बीड येथील रुग्णालयाकडे हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत मेहनती व कष्टाळू स्वभावाचा म्हणून ओळख असलेल्या संकेत काळेच्या अचानक निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी विहिरीच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

error: Content is protected !!