Homeआरोग्यहिमायत फाउंडेशन, गेवराईकडून अपघातग्रस्त इमाम शेख इसाक अहमद यांना ₹५०,००० ची मदत

हिमायत फाउंडेशन, गेवराईकडून अपघातग्रस्त इमाम शेख इसाक अहमद यांना ₹५०,००० ची मदत

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी येथील इमाम शेख इसाक अहमद यांना झालेल्या गंभीर अपघातानंतर त्यांच्या उपचारासाठी हिमायत फाउंडेशन, गेवराई यांच्या वतीने ₹५०,००० ची आर्थिक मदत देण्यात आली आहे. या मदतीमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख इसाक अहमद हे अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगत असून ते गावातील मशिदीत इमाम म्हणून सेवा देत आहेत. ते आपल्या नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात जात असताना कमी दृष्टीमुळे त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली, मात्र त्यांना असलेल्या मधुमेहामुळे (साखरेच्या आजारामुळे) शरीरातील साखरेची पातळी सतत बदलत असल्याने शस्त्रक्रिया अपेक्षित यश देऊ शकली नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

शेख इसाक अहमद हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असून त्यांच्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अपघातानंतर त्यांचे काम थांबल्याने आणि उपचाराचा खर्च वाढल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते.

ही परिस्थिती लक्षात घेऊन हिमायत फाउंडेशन, गेवराई यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या कुटुंबाला ₹५०,००० ची आर्थिक मदत धनादेशाद्वारे दिली. या मदतीमुळे त्यांच्या उपचारासाठी तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे.

हिमायत फाउंडेशनने यापूर्वीही अनेक गरजू, गरीब आणि संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला असून भविष्यातही अशीच सामाजिक सेवा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मुफ्ती उमर कुरेशी, मौलाना ताहेर मक्की, मौलाना अब्दुल हकीम (पाटोदा), बदर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे संचालक सय्यद एजाज सर, फाउंडेशनचे सचिव शेख मुजीब, लुकमान खान, अब्दुल खवी तसेच गावातील जेष्ठ व तरुण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मदतीमुळे शेख इसाक अहमद यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला असून परिसरात हिमायत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!