Homeताज्या बातम्यायेवला वन विभागात ACB चा मोठा दणका : सागवान परवान्यासाठी 11,500 रुपयांची...

येवला वन विभागात ACB चा मोठा दणका : सागवान परवान्यासाठी 11,500 रुपयांची लाच घेताना 6 अधिकारी व 2 दलालांसह 8 जण रंगेहात अटक

प्रतिनिधी उत्तम जाधव, 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत येवला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील सहा लोकसेवक आणि दोन खाजगी व्यक्ती अशा एकूण आठ जणांना 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या दहेगाव-पाटोदा येथील गट क्रमांक 61 मधील 2 हेक्टर 39 आर क्षेत्रातील सागाची झाडे तोडून विक्री करण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक होती. यासाठी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, येवला-अंगणगाव येथे अर्ज केला होता.

परवानगी मंजूर करून देण्यासाठी संबंधित आरोपींनी सुरुवातीला 19,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 11,500 रुपये देण्याचे निश्चित झाले.

दिनांक 16 मे 2026 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दिनांक 19 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी आरोपींनी आपापसात लाचेच्या रकमेची वाटणी निश्चित करून ती स्वीकारताना ACB पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

रामनाथ बोरकडे यांनी तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

कारवाईचा तपशील
या कारवाईत 500 रुपयांच्या 23 नोटा असलेली एकूण 11,500 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. आरोपींविरोधात येवला शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7, 7अ आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नाशिक ACB च्या या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!