विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : तालुक्यातील गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका सुरेखा वडमारे
सेवानिवृत्त शिक्षिका मंदा मुंडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू गायकवाड यांची पत्नी आरती गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माहिती सांगितली.
शेख नुसरत बेगम मन्सूर यांनी सबलीकरण आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,कल्पना चावला, किरण बेदी यांच्या संघर्षमय जीवनाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये महिलांच्या रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लिंबू चमचा, संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या महिलांचा विविध रोपे देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथील माजी विद्यार्थिनी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महिला दिनानिमित्त गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथील उपस्थित सर्व महिलांना रोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामपंचायत महिला सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, महिला बचत गटाचे सदस्य, महिला ग्रामसंघाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सुरेखा वडमारे शेख नुसरत बेगम मन्सूर ज्योती कुलकर्णी रेखा ससाणे नर्मदा शिरसाट अश्विनी ससाणे यांनी परिश्रम केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कुलकर्णी यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सुरेखा वडमारे यांनी व्यक्त केले.






















