Homeताज्या बातम्याआणखी एका मोठ्या संकटासाठी तयार राहा - WHO ने जगाला दिला इशारा...

आणखी एका मोठ्या संकटासाठी तयार राहा – WHO ने जगाला दिला इशारा…

आणखी एका मोठ्या संकटासाठी तयार राहा – WHO ने जगाला दिला इशारा…

नवी दिल्ली : अमेरिकेत काही दिवस कोरोनाचं प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्यानंतर आता पुन्हा रुग्णांची संख्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिका व्यतिरिक्त ब्राझील (Brazil), रशिया (Russia) आणि भारत (India) या देशात देखील कोरोनाचा कहर सुरू आहे. गुरुवारी जगभरात संक्रमणाची १,१६,३००० हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यानंतर संक्रमणाची एकूण संख्या ६ दशलक्षांच्या जवळपास गेली आहे.

गेल्या २४ तासांत ५००० हून अधिक लोक संक्रमणामुळे मरण पावले आणि आतापर्यंत एकूण मृत्यूंचा आकडा ३,६१,५०० पर्यंत वाढला आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या १,०१,३३७ वर पोहोचली आहे.

अमेरिकेत संक्रमित लोकांची संख्या सर्वाधिक आहे. इथे १७,१२,८१६ जण संक्रमित आहेत. यानंतर ब्राझील दुसर्‍या स्थानावर आहे, जिथे सुमारे ४ लाख १२ हजार लोकांना संसर्ग आहे. तिसर्‍या क्रमांकावर रशिया आहे. इथे सुमारे ३,८०,००० लोक संसर्गित आहेत.

WHO ने दिली चेतावणी – दुसर्‍या मोठ्या संकटासाठी तयार रहा :-

जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष अधिकारी डॉ.डेव्हिड नाबरो यांनी ‘कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या धक्क्यासाठी आपण तयार असलं पाहिजे’ असं म्हटलं आहे. ते म्हणाले आहेत की “लॉकडाउन जसजसे कमी होतं तसतसं कोरोना संसर्ग प्रकरणात आणखी एक मोठी उडी घेऊ शकते आणि त्यासाठी योग्य तयारी केली पाहिजे. कोव्हिड-१९ मधील मृतांची संख्या चीनपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत ४,७०६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर चीनने आतापर्यंत ४,६३८ मृत्यूची अधिकृतपणे पुष्टी केली आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जर्मनीत संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं :- 

गेल्या २४ तासांत जर्मनीमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची ७४१ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. त्यानंतर जर्मनीमध्ये संक्रमणाची संख्या एक लाख ८० हजार ४५८ वर गेली आहे. जर्मनीमध्ये कोव्हिड -१९ मुळे आतापर्यंत ८,४५० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोव्हिड -१९ पासून गेल्या २४ तासांत ४१ लोकांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

संपुर्ण महाराष्ट्रातील तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे

मुख्य संपादक मुज्जम्मील शेख – ७५०७७३७३१३

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच मनपाच्या बांधकाम...

0
Times Of Maharashtra Desk पुणे : अनधिकृत बांधकामाविरोधात दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी वेगळ्याच विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेत नागरिकांना गोंधळात टाकण्याचा प्रकार पुणे महानगरपालिका...

निफाडमध्ये शिव पाणंद शेतरस्ते मोहिमेला वेग; एकाच दिवशी सात गावांची मोजणी पूर्ण

0
नाशिक (प्रतिनिधी योगेश कर्डिले) :  निफाड तालुक्यात शिव पाणंद शेतरस्ते चळवळीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, कागदावर असलेले शासन निर्णय आता प्रत्यक्षात उतरू...

भुसावळ नगराध्यक्ष अपात्र! जात प्रमाणपत्र वादामुळे गायत्री भंगाळे यांना मोठा धक्का

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : भुसावळ नगरपरिषदेत मोठी राजकीय उलथापालथ घडली असून नगराध्यक्ष गायत्री रूपचंद गोर उर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले...

लोणेरे हत्याकांडाला वेग: आरोपी न्यायालयीन कोठडीत, कठोर कलमांखाली खटला तीव्र

0
लोणेरे-अलिबाग (प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या लोणेरे येथील पल्लवी मोरे हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद...

नसरापूर प्रकरणावर संताप: दौंडमध्ये ABVP कडून राष्ट्रपतींना निवेदन, कठोर शिक्षेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk :  दौंड : नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना, दौंडमध्येही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले...

error: Content is protected !!