Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन बैठक राजगोपाल भंडारी सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीत दौऱ्याचे नियोजन, सुरक्षेची व्यवस्था तसेच विकासकामांच्या उद्घाटनाची रूपरेषा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी शिक्षण मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल आणि आमदार काशीराम पावरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सर्व यंत्रणांनी समन्वय साधून दौरा यशस्वी करण्याचे आवाहन केले. त्यांनी विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी गती देण्याचेही निर्देश दिले.

बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपनगराध्यक्षा संगीताताई देवरे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, शिसाका चेअरमन माधवराव पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी दौरा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

error: Content is protected !!