Homeदेश-विदेशअमित शहांची मोठी घोषणा ; कोविड लसीकरण संपताच होणार CAA ची अंबलबजावणी...

अमित शहांची मोठी घोषणा ; कोविड लसीकरण संपताच होणार CAA ची अंबलबजावणी…

अमित शहांची मोठी घोषणा ; कोविड लसीकरण संपताच होणार CAA ची अंबलबजावणी…

टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) :- पश्चिम बंगाल निवडणुकांबाबत राजकारण सध्या तापले आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बंगाल दौर्‍यावर आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा बंगालमध्ये दाखल झाले, यावेळी त्यांनी आपल्या भाषणामधून ममता बॅनर्जी यांचा किल्ला उद्ध्वस्त करण्याबाबत भाष्य केले. महत्वाचे म्हणजे शाह यांनी यावेळी सीएएचा (CAA) उल्लेख केला. ते म्हणाले कोविड लसीकरणाची (COVID Vaccination) प्रक्रिया संपल्यानंतर पश्चिम बंगालच्या मतुआ समुदायासह सीएए अंतर्गत शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू होईल.

यासह, नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याबाबत अल्पसंख्याकांची दिशाभूल केल्याचा विरोधी पक्षांवर आरोप करीत ते म्हणाले की, सीएएच्या अंमलबजावणीचा भारतीय अल्पसंख्याकांच्या नागरिकत्वावर परिणाम होणार नाही.

यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी एक अपयशी मुख्यमंत्री आहेत असे म्हणत, शाह यांनी बंगालमध्ये विकासासाठी भाजपाला निवडून आणण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले. ‘आम्ही खोटे वचन दिल्याचे ममता दीदी म्हणाल्या व त्यांनी सीएएला विरोध करण्यास सुरुवात केली. सीएएला आपण आपल्या राज्यात कधीच परवानगी देणार नाही असेही त्या म्हणाल्या. मात्र भाजपा नेहमीच केलेली आश्वासने पूर्ण करतो. आम्ही हा नवीन कायदा आणला आहे आणि त्यामुळे निर्वासितांना नागरिकत्व मिळेल.’

ठाकुरानगर या मतुआबहुल भागातील मोर्चात अमित शहा म्हणाले, ‘आम्ही सीएए लागू करणार होतो मात्र त्याचवेळी कोरोनाचे संकट उभे राहिले. आता लसीकरण करण्याचे काम संपताच, कोरोनातून मुक्त होताच भाजपा सरकार आपणा सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम करेल.

दरम्यान, मतुआ समाज हा मूळचा पूर्व पाकिस्तानचा असून, विभाजन आणि बांगलादेश निर्मितीनंतर ते हिंदुस्थानात स्थलांतरित झालेल्या दुर्बल घटकातील हिंदू लोक आहेत. त्यापैकी बर्‍याच जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे पण अजूनही काही लोकांना ते मिळाले नाही. यावर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याने, सीएएच्या अंमलबजावणीला विरोध करण्याच्या स्थितीत त्या नसतील असेही शाह म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!