पुणे आंबेगाव तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यानंतर मादी व बछडा जेरबंद…

पुणे आंबेगाव  तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यानंतर मादी व बछडा जेरबंद…
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील वाळुंजनगर व खडकवाडी परिसरात मागील तीन महिन्यात बिबट्याने मनुष्यावर हल्ला करण्याच्या एकूण सात घटना घडल्या असुन त्यामध्ये एकूण सात जन जखमी झाले आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने वेगवेगळ्या तीन ठिकाणी पिंजरे लावले होते वाळुंजनगर येथे लावलेल्या पिंजऱ्यात आज शुक्रवारी पहाटे एकाच वेळी बिबट मादी व बछडा दोघेही एकत्र जेरबंद झाले आहे.

 

पुन्हा काही दिवसातच मोटारसायकलवर चाललेल्या रामदास सुक्रे यांच्यावर बिबट्याने हल्ला करुन त्यांच्या पायावर पंजा मारून जखमी केल्याची घटना ताजी असताना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वडिलांच्या सोबत केक आणण्यासाठी संवीदणे वरून लोणी कडे मोटार सायकलवर जाताना खडकवाडी गावाच्या हद्दीतील धुमाळस्थळ परिसरातून जात असताना बिबट्याने मागून येऊन चालू मोटारसायकलवर हल्ला करून १३ वर्षीय वैष्णवी मंगेश लंघे या मुलीच्या डाव्या पायावर हल्ला करून जखमी केले होते. दि. १३ मे रोजी खडकवाडी येथील ओढ्याजवळ दशरथ कारभारी डोके यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता त्यानंतर वाळुंजनगर येथे दि.3 जुन रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मंगेश जयसिंग वाळुंज या तरुणावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. त्यामुळे परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

 

👆👆Click the Image 👆👆👆

परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना थांबत नसल्याने वनविभागाने बिबट्याची चाहूल लागण्यासाठी तालुक्यात प्रथमच या ठिकाणी एआय आणि एज कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानयुक्त मशीन तसेच कोणताही जंगली प्राणी परिसरात आल्यास त्याची माहिती मिळण्यासाठी अनायडर मशीन बसवले. त्याच बरोबर अवसरी / गावडेवाडी बिबट शीघ्र कृती दलाच्या वतीने या भागात दररोज गस्त घालून जनजागृती केली जात आहे.

वेगवेगळ्या तीन ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. बिबट्याचे हल्ले थांबत नसल्याने या परिसरात थर्मल ड्रोन व्दारे सर्वेक्षण केले तरीही बिबट्या काही जेरबंद होत नव्हता.

आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वाळुंजनगर येथील दत्तात्रय बबन वाळुंज यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी एकत्रच एक मादी आणि नर बछडा जेरबंद झाले. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल निलम चव्हाण, वनरक्षक योगेश निघोट तसेच रेस्क्यू सदस्य मनोज तळेकर, अवसरी- गावडेवाडी बिबट शीघ्र कृती दलाचे चारूदत्त बांबळे, धर्मेंद्र ढगे, बाप्पू वाघ, हर्षल गावडे, दीपक भोंडवे, प्रज्वल आवारी, प्रकाश हिले, कुणाल गावडे, ऋषिकेश विधाटे, शुभम शिस्तार, महेंद्र दाते, शुभम येवले यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बिबट मादी व बछड्याला अवसरी वन उद्यानात घेऊन गेले. बिबट मादी व बछड्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात नेले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी सांगितले.

अमोल सातपुते – जुन्नर वनविभागाचे उपवन संरक्षव