Homeताज्या बातम्याप्रकरणातील शेतकऱ्यांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय ?

प्रकरणातील शेतकऱ्यांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय ?

पुणे भामा आसखेड: भामा आसखेडच्या प्रकल्पबाधित

शेतकऱ्यांनी फसवणूक प्रकरणी या कामाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

आंबेठाण : प्रकल्पग्रस्त भामा आसखेड आंदोलकांवर खेड

न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याचा आज (दि.१३) निकाल लागला असून यामध्ये १८ आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात आले. यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. २०२२ सालापासून प्रकल्पग्रस्त आंदोलकांविरोधात हा खटला सुरू होता.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇

का झाला होता गुन्हा दाखल ?

भामा आसखेडच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबित असणाऱ्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यातून ते पुणे शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या जलवाहिनीला विरोध करीत होते. जलवाहिनी पूर्ण व्हावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरव राव प्रयत्नशील होते. काम पुढे सरकण्यासाठी त्यांनी त्यावेळी आंदोलक शेतकऱ्याच्या काही मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्या होत्या.

त्यात एक किलोमीटर परिसरातील जलवाहिनीचे काम बाकी ठेवले जाईल असे सांगितले होते. परंतु त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हे एक किलोमीटर जलवाहिनीचे काम सुरू केले. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाली असे सांगत या कामाला विरोध केला होता. त्यावेळी सुरू असलेले जलवाहिनीचे काम थांबविले म्हणून या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गुन्हे मागे घेतलेले शेतकरी

देवदास बांदल, सत्यवान नवले, दत्तात्रय होले, नामदेव देशमुख, तुकाराम नवले, स्वप्नील येवले, धोंडीभाऊ शिंदे, संजय पांगारे, अण्णा देवाडे, गौरव देशमुख, संदीप साबळे, भागुजी राजगुरव, संतोष कावडे, गजानन कुडेकर, मंदार डांगले, संतोष साबळे, रोहिदास जाधव या शेतकऱ्यांनी गुन्हे मागे घेतले आहेत. खेड न्यायालयात ए.एस. सय्यद यांच्या न्यायालयात हा दावा सुरू होता. या दाव्यात आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने जितेंद्र सावंत यांनी यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अटलांटा प्रकरणात महापालिकेला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : विमानतळ विकासाशी संबंधित अटलांटा कंपनी प्रकरणात जळगाव महापालिकेला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालय यांनी महापालिकेची याचिका फेटाळून...

ब्रह्मपुरी हादरली! शस्त्रक्रियेनंतर तिघांना कायमचे अंधत्व; हॉस्पिटलचा परवानाच गुल.

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : वैद्यकीय क्षेत्राला देवदूताचा दर्जा दिला जातो आणि 'रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' मानली जाते. मात्र, ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये या तत्त्वाला...

भाजपचा निष्ठावंत चेहरा डॉ. अशोक ओळंबे शिंदे गटात; समीकरणे बदलणार?

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : भाजपला अकोल्यात मोठा धक्का RSS स्वयंसेवक डॉ. अशोक ओळंबे यांचा शिंदे गटात प्रवेश. सविस्तर वृत्त अकोला : अकोला जिल्ह्यात...

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

error: Content is protected !!