Homeताज्या बातम्यासंजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची लूट; नेट कॅफे आणि दूधवाल्याकडून ३०० ते...

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची लूट; नेट कॅफे आणि दूधवाल्याकडून ३०० ते ४०० रुपयांची उकळपट्टी

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  शासनाने निराधार, वृद्ध, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुरू केलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आता डिजिटल सुविधेच्या नावाखाली आर्थिक लुटीचा सामना करावा लागत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये ‘बी.एस.ए.’ या मोबाईल ॲपद्वारे लाभार्थ्यांचे ई-केवायसी (हयात असल्याचा दाखला) करून देण्यासाठी काही खासगी नेट कॅफे चालक आणि ‘विजय दूधवाले’ यांसारखे व्यावसायिक लाभार्थ्यांकडून प्रति व्यक्ती ३०० ते ४०० रुपयांची बेकायदेशीर वसुली करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वास्तविक पाहता, ही योजना पूर्णपणे शासकीय असून यासाठी नाममात्र शुल्क आकारण्याचे नियम आहेत. मात्र, बहुतांश लाभार्थी हे वृद्ध, अशिक्षित आणि दुर्गम भागातील असल्याने त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे. “आम्हाला शासनाचा भत्ता हवा असल्यास एवढे पैसे द्यावेच लागतील,” अशी भीती दाखवून ही लूट सुरू असल्याचे समजते. या वाढत्या लुटीमुळे गरीब लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

या गंभीर प्रकरणाची ब्रह्मपुरीचे प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शासनाने या लुटीची सखोल चौकशी करून दोषी नेट कॅफे चालक आणि संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.

अभिप्राय
“संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी (BSA ॲप) पूर्णपणे मोफत असून, यात सामान्य नागरिकांची आर्थिक लूट खपवून घेतली जाणार नाही. ब्रह्मपुरी तालुक्यातील काही नेट कॅफे चालक आणि खाजगी व्यक्ती लाभार्थ्यांकडून बेकायदेशीर पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आम्ही तात्काळ तहसीलदार प्रशासनाला दिले आहेत. जे केंद्र चालक किंवा खाजगी व्यक्ती वृद्ध आणि गरजू लाभार्थ्यांची फसवणूक करत आहेत, त्यांचे परवाने तात्काळ रद्द केले जातील आणि त्यांच्यावर थेट पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे (FIR) दाखल केले जातील. लाभार्थ्यांनी अशा दलालांना एकही रुपया देऊ नये, असे आवाहन आम्ही करत आहोत.”

प्रांत अधिकारी पर्वणी पाटील ब्रह्मपुरी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

error: Content is protected !!