Homeताज्या बातम्याशिवराज्याभिषेक दिनानिमित्त पहिल्यांदा ऑनलाईन कवी संमेलन...

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पहिल्यांदा ऑनलाईन कवी संमेलन…

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पहिल्यांदा ऑनलाईन कवी संमेलन…

दौंड -:(प्रतिनिधी विशाल घिगे): कोरोना या आजारामुळे सध्या संचारबंदी व जमावबंदी कायदा संपुर्ण महाराष्ट्रात लागु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पहिल्यांदाच ऑनलाईन कवी संमेलन ७ जून रोजी संध्याकाळी ९ वाजता थाटात संपन्न झाले. हे असे ऑनलाईन पद्धतीचे कवी संमेलन महाराष्ट्रात पहिलेच ठरले आहे.

या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी बुलढाणा येथील सुप्रसिद्ध कवी.बी.एल.खान होते. कवी संमेलनाचे उदघाटन युवा साहित्यिक खाजाभाई बागवान यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कवी.इकबाल रसुलसाब उपस्थित होते.कवी संमेलन अध्यक्षांनी स्वागतपर कविता गाऊन कविसमेलनाची सुरवात केली व उदघाटन पर कवी.खाजाभाई बागवान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारी कविता सादर करून सुरुवात केली.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका येथील प्रसिद्ध कवयित्री अनिसा शेख यांनी “दैवत छत्रपती” ही कविता सादर केली. सिंधुदुर्ग येथील कवी रघुनाथ राजापूरकर यांनी प्रेम भाव व्यक्त करणारी कविता सादर केली तर उस्मानाबादचे कवी बिभीषण गिरी यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी कविता सादर केली. कवयित्री माणिक नागावे यांनी शिवार ही कविता सादर केली. तर कवी दत्ता पेंदारे यांनी भाकर कविता सादर करताना भाकरीचे महत्व पटवून दिले. कवी.जाकीर तांबोळी यांनी निसर्गावरची कविता सादर केली. तर कवी फिरोज बागवान यांनी तिळे ही हास्य कविता सादर केली. या संमेलनात कवी लक्ष्मण जाधव(पंढरपूर), प्रसिद्ध कवी.विजय लुल्हे(जळगाव) यांनी कोरोना विषयक कविता सादर केली. कवी.अहमद शेख(बसमत) यांनी गीत गाऊन सर्वांची मने जिंकली तर कवी सुयश चव्हाण यांनी अप्रतिम कविता सादर केली. संमेलनाच्या समारोपावेळी अध्यक्षांनी दारुड्याची शाळा ही हास्य कविता सादर केली. या कविसमेलनाची सूत्रसंचालन कवी.शेख शफी बोल्डेकर यांनी केले तर आभार कवी.जाकीर तांबोळी यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!