Homeताज्या बातम्यागेवराई-भिवंडी बससेवा अचानक बंद; प्रवाशांचे प्रचंड हाल

गेवराई-भिवंडी बससेवा अचानक बंद; प्रवाशांचे प्रचंड हाल

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई आगारातून अनेक वर्षांपासून नियमित सुरु असलेली गेवराई-भिवंडी बससेवा मागील काही दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे ही बससेवा बंद करण्यामागे आगारप्रमुखांचा मनमानी व गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप प्रवासी, नागरिकांकडून करण्यात येत आहे.
     गेवराई आगारातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटणारी ही बस पाडळशिंगी, मादळमोही, कोळगाव, तिंतरवणी, पाथर्डी, अहिल्यानगर (अहमदनगर) मार्गे भिवंडीपर्यंत जात होती. या मार्गावरील शेकडो प्रवाशांसाठी ही बस अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. विशेषतः अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी जाणारे रुग्ण, कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक तसेच विद्यार्थी यांच्यासाठी ही बससेवा मोठा आधार होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ही बस अधूनमधूनच सोडली जात असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर मागील चार-पाच दिवसांपासून ही बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याबाबत आगार प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 
   मुळात या मार्गावर आधीच बससेवा कमी असताना वर्षानुवर्षे नियमित सुरु असलेली गेवराई-भिवंडी बस अचानक बंद करण्यामागे आगारप्रमुखांना नेमके साध्य काय करायचे आहे?
असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ही बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत असताना आगारप्रमुख मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. या मनमानी कारभारामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे आगारप्रमुखांच्या गलथान व निष्क्रिय कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून तात्काळ ही बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!