Homeताज्या बातम्याशेठ ज्योतीप्रसाद विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक

शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक

दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे)

पारगाव येथे 28 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झालेल्या दौंड तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यालयाचे प्राचार्य श्री. नवनाथ कदम यांनी ही माहिती दिली.

कमययोगी कुस्ती केंद्र, पारगाव येथे झालेल्या या स्पर्धेत 68 किलो वजन गटात कु. गणेश जाधव, 65 किलो वजन गटात कु. कृष्णकांत जाधवर तर 50 किलो वजन गटात कुमारी ज्ञानेश्वरी देशमुख यांनी उत्कृष्ट खेळ सादर करत आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. या तिन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पुणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता मिळविली असून आता ते इंदापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत विद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या यशस्वी खेळाडूंचे क्रीडा शिक्षक श्री. संताजी आटोळे व श्री. गुरुनाथ कोळी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे मानद सचिव माननीय प्रेमसुखजी कटारिया, चेअरमन श्री. विक्रमशेठजी कटारिया, विद्यालयाचे प्राचार्य श्री. नवनाथ कदम, उप प्राचार्य श्री कृष्ण देवकर,पर्यवेक्षक श्री. रामदास भोले, पर्यवेक्षिका सौ. कुंतकला चौदार तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या विजयामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यार्थ्यांकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२९ वर्षांच्या परंपरेला नवी दिशा, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम; गोदरेज समूहाचा नवा प्रवास सुरू

0
Times Of Maharashtra Desk : मुंबई गोदरेज उद्योग समूह या १२९ वर्षांच्या परंपरा असलेल्या समूहाने आपली नवी ब्रँड ओळख आणि भविष्यातील धोरण जाहीर केले....

जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे आढळली मानवी कवटी; दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू

0
माण (प्रतिनिधी धनंजय कवडे) : माण तालुक्यातील शिंगणापूर गावाच्या हद्दीत एक बेवारस मानवी कवटी आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे...

शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची वाळवी! ४१९ तोळे सोने अन् कोट्यवधींची माया; दीड दिवसात जामीन?

0
पुणे : ज्यांच्या खांद्यावर शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता टिकवण्याची जबाबदारी होती, तेच 'शालार्थ आयडी' घोटाळ्याच्या चौकशीचे प्रमुख आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष...

रोहन ओव्हाळ खून प्रकरणाचा मास्टरमाईंड जेरबंद; मार्केटयार्ड पोलिसांची ६ तासांत धडाकेबाज कारवाई

0
Times Of Maharashtra Desk : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या प्रसिद्ध रॅपर आणि रील स्टार रोहन कांतीलाल ओव्हाळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात...

पुण्यात बिल्डरची फसवणूक करून फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा; प्रविण ओसवाल यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये...

0
Times Of Maharashtra Desk : पुण्यातील कोंढवा परिसरात एका नामांकित बिल्डरची फसवणूक करून, फ्लॅटचे पूर्ण पैसे न देताच बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

error: Content is protected !!