Homeमहाराष्ट्रअवकाळी पावसाचा तडाखा शिरपूरमध्ये शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाईची मागणी

अवकाळी पावसाचा तडाखा शिरपूरमध्ये शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाईची मागणी

शिरपूर (प्रतिनिधी शेटे): शिरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तात्काळ वाढीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ‘शिरपूर फर्स्ट’ संघटनेने केली आहे.

या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत निवेदन सादर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कांदा, मका आणि केळीची पिके गळ्यात टांगून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे भाटपुरा, सावेर, अजनाड, थाळनेर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर २ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे ३० गावांतील शेतीचे नुकसान वाढवले. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाई मिळालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

याशिवाय पीक विम्याची थकीत रक्कम लवकर वितरित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास येत्या सात ते आठ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

यावेळी हंसराज चौधरी, चेतन मोरे, प्रशांत राजपूत, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!