स्थानिकांचा रोष; “तिकीट दिलं तर डिपॉझिट जप्त होणारच” – कार्यकर्त्यांचा मध्ये धुसफूस…
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असून सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यानंतर कोंढव्यात राजकीय समीकरणे चांगलीच ढवळून निघाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही गटात इच्छुकांची रांग लागली असताना काही नेते स्वतःचा प्रभाग सोडून इतर प्रभागातून उमेदवारीसाठी धडपड करत आहेत.
स्थानिकांमध्ये यामुळे नाराजीचा सूर उमटत असून, “येथे आधीच भरपूर निष्ठावान कार्यकर्ते आहेत, मग बाहेरून आलेल्याचा विचार का?” असा सवाल नागरिक आणि पक्षातील कार्यकर्ते विचारत आहेत.
विधानसभा तयारीतून माघार, आता पुन्हा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीत मोठी जय्यत तयारी करूनही शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या या चेहऱ्याने आता पुन्हा प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समजते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये “यांच्याशी कुठे सेटलमेंट झाली का?” अशा चर्चाही रंगल्या आहेत.
“तिकीट दिलं तर थेट अपमान”
स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जर अशा उमेदवाराला पक्षाने तिकीट दिले, तर तो केवळ पराभूत होणार नाही, तर डिपॉझिटही जप्त होईल.
कोंढव्यातील नागरिकांचा पाठिंबा मिळवणे या उमेदवारासाठी जवळजवळ अशक्य असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
पक्ष नेतृत्वासमोर मोठा पेच…
कोंढव्यात आधीच दमदार इच्छुकांची मोठी फळी असून, पक्षाने बाहेरून आलेल्या वादग्रस्त इच्छुकाला तिकीट दिल्यास स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष वाढू शकतो. परिणामी पक्षालाच फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित इच्छुकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
एका इच्छुक उमेदवाराचा तर भलताच कारभार…
यामध्ये एक उमेदवार बाबत तर मोठा गौप्यस्फोट समोर आले आहे. या उमेदवाराला तीन मुलं आहेत. त्याने तिसऱ्या आपट्ट्याला (मुलाला) आपल्या भावाच्या नावावर टाकले असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यावर दुसरे पक्ष अतिशय आनंदात आहे. जर या उमेदवाराला तिकीट मिळाले तर विरोधक फॉर्म भरू देणार आणि फॉर्म भरल्यानंतर अर्ज छाननीत बाद करणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप गट) समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.






















