दौंड (प्रतिनिधी मयुर साळवे) :-
इंदापूर येथे 20 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत दौंड येथील शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयातील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ कदम यांनी ही माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल निमगांव केतकी तालुका इंदापूर येथे झालेल्या या स्पर्धेत 65 किलो वजन गटात कु.कृष्णकांत जाधवर यानी उत्कृष्ट खेळ सादर करत आपल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. या खेळाडूनी दमदार कामगिरी करत पुणे विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता मिळविली असून आता अ. नगर येथे होणाऱ्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत विद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या यशस्वी खेळाडूला क्रीडा शिक्षक संताजी आटोळे व गुरुनाथ कोळी यांनी मार्गदर्शन केले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, चेअरमन विक्रम कटारिया, विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ कदम, उप प्राचार्य श्रीकृष्ण देवकर, पर्यवेक्षक रामदास होले, पर्यवेक्षिका कुंतिका चौदार तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या विजयामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण असून,विभागस्तरीय स्पर्धेतही विद्यार्थ्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.






















